Boiled Egg Google
फूड

Benefits of Boiled Egg: हिवाळयात उकडलेली अंडी का खावी?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला परवडेल, प्रत्येक ठिकाणी सहजपणे उपलब्ध होईल आणि शरीराला आवश्यक असे भरपूर प्रोटिन्स देणारे एक खाद्य घटक म्हणजे अंडे होय .अंडे हे प्रोटीनचे मोठे स्त्रोत आहे. अंड्याला वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जाते. उकडलेल्या अंड्यात हेल्दी फॅट असते. जे वजन वाढू देत नाही. अंड्यात असलेले व्हिटामिन डी सर्दी पासून बचाव करते. नियमित एक अंडे उकडून खाल्याने रोगप्रतीकार शक्ती वाढण्यास मदत करतात. याचा फायदा त्वचा, डोळे आणि केसांना होतो. हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडायला लागते. शरीरातील उर्जा कमी होत जाते. अशावेळी हेल्दी फूड खाणे गरजेचे असते. तुम्ही उकडलेली अंडी हा पर्याय वापरू शकता. अंडी खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

अंड्यात असणारे घटक

एका उकडलेल्या अंड्यातून 77 कॅलरीज मिळतात. याशिवाय यात 0.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 5.3 ग्रॅम फॅट, 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, 2 ग्रॅम मोनोसॅच्युरेटेड फॅट, 212 मिलीग्राम कोलेस्टेरॉल, 6.3 ग्रॅम प्रोटीन, 6 टक्के व्हिटॅमिन ए, 15 टक्के व्हिटॅमिन बी 2, नऊ टक्के व्हिटॅमिन बी12, 7 टक्के व्हिटॅमिन बी 5, 86 मिलीग्राम फॉस्फरस आणि 22 टक्के सेलेनियम आढळतात. हिवाळ्यात शरीरातील आतील तापमान वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.

हृदययासाठी उपयुक्त

हृदयाची धडधड चांगली राहिली तर आपले संपूर्ण शरीर चांगल्या पद्धतीने राहते. याचा हृदययासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक अंड्यामधून उपलब्ध होतो. अंड्यांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यात कोलेस्ट्रॉल असते मात्र, हृदयासाठी ते हानिकारक नसते.

डोळे आणि मेंदूसाठी फायदेशीर

डोळे आणि मेंदू हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि या दोन्ही अवयवासाठी आवश्यक असणारे घटक अंडी मधून मिळते.अंड्यांत असणारे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. अंड्यांमध्ये कोलीन हे रसायन आढळते, जे स्मरणशक्ती वाढवते शिवाय मज्जासंस्था मजबूत करते.

प्रोटीनची कमतरता भरून काढतो

शरीरात प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे असते. एका अंड्यात सहा ग्रॅम प्रोटीन असते. यामुळे अंडी जर नियमित खाल्ली गेली तर शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघते. आणि तुमची ताकद वाढते. शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्याचे काम प्रथिने करतात.

लोहाची कमतरता भरून काढते

अंड्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. अंडी खाण्याने थकवा दूर होतो. तुम्हाला जर चक्कर येत असेल तर अशावेळी अंड्याचा उपयोग होतो. शरीरातील लोहाचे प्रमाण भरून काढण्यासाठी अंड्यातील पिवळा बलक खाल्ला पाहिजे.

रोगप्रतीकार शक्ती वाढते

रोज नियमित एक अंडे खाल्याने रोगप्रतीकार शक्ती वाढण्यास मदत होते. अंड्यात अॅंटी ऑक्सीडेंट्स, व्हिटामिन, प्रोटीन आणि खूप सारे पोषक तत्वे असतात. जे तुम्हाला सदृढ़ बनवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT