थंडीत हळद दूध पिण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे Google
फूड

Benefits Of Turmeric Milk: थंडीत हळद दूध पिण्याचे 'हे'आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या दिवसात हळद आणि दूधाचा खूप फायदा होतो. हळद हा एक असा घटक आहे, जो प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात असतोच. हळदीत आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहेत. याशिवाय अॅंन्टी- सेफ्टीक आणि अॅन्टी बायोटिक गुणधर्म असतात. याचबरोबर दूधालाही कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत मानला जातो. त्यामुळे दूध आणि हळद एकत्र आले तर याचे गुणधर्म आणखी वाढतात. दूध आणि हळदीत कॅल्शिअम, आर्यन, सोडियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरची मात्रा असते. यामुळे शरीरातील अनेक समस्यांना तोंड देण्यास मदत करतात. हळदीच्या दूधाने रोगप्रतीकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी थंडीच्या दिवसात नियमित हळद घातलेले दूध घ्यावे.

पोटाचा अल्सर

हळदीच्या दुधाचा पोटाच्या अल्सरवरील उपचारासाठी मोठा फायदा होतो. हळदीच्या दुधात अॅंटी- इनफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे पोटांच्या तक्रारी दूर करतात.

इन्फेक्शनः

शरीरातील कोणत्याही इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी हळदीचे दुध रोज घ्यावे. हळदीच्या दुधात अॅंटी-माइक्रोबायल असतात. जे बॅक्टीरिअल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात.

इम्युनिटीः

इम्युनिटी मजबूत होण्यासाठी तुम्ही हळद व दूध नियमित घ्यावे. हळदीत असणारे करक्यूमिन हे इम्यूनोमॉड्यूलेटरी एजेंटचे काम करतात. ज्यामुळे आपल्याला अनेक आजारापासून मुक्ती मिळू शकते.

सुज :

शरीरावरील येणारी सुज आणि दुखण्याने त्रस्त असाल तर दूध नियमित घ्या. हळदीत आणि दूधात असणारे विविध घटक शरीरीतील दुखणे कमी करण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT