Til Laddu Benefits Sakal
फूड

Til Laddu Benefits : हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी!

जाणून घ्या हिवाळ्यात तीळ का खावेत आणि त्याचे फायदे काय आहेत…

Aishwarya Musale

हिवाळा ऋतू सर्वांनाच आवडतो. या ऋतूत प्रवास करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. यासोबतच या ऋतूत विविध प्रकारचे खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. हा ऋतू खूप सुंदर असला तरी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

हिवाळ्याच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे आतापासून तुमच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे शरीराला ऊब मिळेल.

असे काही बनवायचे असेल तर तिळ गुळाचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. याचे सेवन केल्याने शरीर उबदार तर राहतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आज आम्ही तुम्हाला ते बनवण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.

तीळ-गुळाचे लाडू बनवण्याचे साहित्य

  • गूळ - १ कप

  • तीळ (पांढरे) - २ कप

  • तूप - २ चमचे

  • वेलची पावडर - 1 टीस्पून

  • नारळ - 2 चमचे (किसलेले)

लाडू बनवण्यासाठी प्रथम कढईत तीळ टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. हे सुमारे 5-7 मिनिटांत होईल. तीळ भाजल्यानंतर वेगळ्या भांड्यात ठेवा.

आता त्याच कढईत तूप मंद आचेवर वितळवून घ्या. कढईत गूळ टाका आणि वितळू द्या. आता गॅसवरून पॅन काढा आणि 3 मिनिटे बाजूला ठेवा.

गूळ वितळल्यावर थोडासा थंड होऊ द्या आणि नंतर त्यात तीळ, वेलची पूड आणि किसलेले खोबरे घाला. शेवटी ते चांगले मिसळा.

सर्व काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता त्या मिश्रणाचे एक एक करून लाडू तयार करा. आता हे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

तिळाचे आरोग्य फायदे

तिळात भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. तिळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहे. तिळामध्ये तेल भरपूर असते, जे तुमच्या त्वचेसाठी, हाडांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT