Healthy And Tasty Recipes:  Sakal
फूड

Healthy And Tasty Recipes: टिफिनसाठी झटपट बनवा 'हे' 3 चवदार पदार्थ

कधी कधी डब्याला चटकमटक आणि हलकेफुलके खावेसे वाटते. अशावेळी पुढील पदार्थ बनवू शकता.

सकाळ वृत्तसेवा

Healthy And Tasty Recipes: कधी कधी डब्याला चटकमटक आणि हलकेफुलके खावेसे वाटते. नीट तयारी केलीत तर एअर टाइट कंन्टेनरमध्ये तुम्ही सूप, मठ्ठा, कोकम सार नेऊ शकता. उन्हाळ्यात तर हे पदार्थ खूप उपयुक्त ठरतात. मग वाट कसली पाहताय. मुक्तपीठचा टिफिन डब्बा वाचा आणि झटपट रेसिपी तयार करा.

कलाकंद

साहित्य

दुध १ लीटर ,दही २ चमचे ,रवा १ चमचा ,साखर ४ चमचे ,डिंक १ चमचा , तुप  १ चमचा.

कृती

दुध गरम करा व त्यात दही टाका. दुध  फाटेल. दुसर्या बाजूला एका पातेल्यात तूप गरम करा. यामध्ये डिंक व रवा परतवून घ्या. आता डिंक व रवा दुधात टाका व साखरेचे  क्यारमल करून  वरील मिश्रण टाका. कलाकन्द तयार

खमंग ढोकळा

साहित्य

रवा २ वाटी ,दही १ वाटी, मीठ (चवीनुसार) ,साखर १ चमचा ,ईनो १ पुडी , हिरवी मिरची ,लसुन ३/४ पाकळ्या , तेल ,कडीपत्ता+कोथंबीर

कृती 

रवा, दही +साखर + मीठ +( हिरव्या मिरच्या + लसुन  ठेचुन)  हे सर्व एकत्र करून थोडे पाणी टाका. २ चमचे तेल घेऊन त्यात ईनो १ पुडी टाका. खोल थाळीला तेल लावून मिश्रण ताटात ओतून घ्या. स्टीमर, कुकर किंवा ढोकळा यंत्रामध्ये  २० मिनिटे वाफवून घ्या. एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी व कडीपत्ता टाका. तळलेले तेल व बारीक चिरलेली कोथंबीर ढोकळ्यावर टाका. गरमागरम खमंंग ढोकळा तयार

अळू वडी

साहित्य 

अळुचे पान , बेसन,चिंच, गुळ,तिखट ,मीठ जिरे,मोहरी ,तेल, काळा मसाला

कृती 

आळुची पाने स्वच्छ धुवा.  चिंच व गुळाच्या पाण्यात बेसन व मीठ  एकत्र करून अळुच्या पानाला लावा.नंंतर पानाचा रोल करून वाफवून घ्या. उकडलेल्या पानाचे रोल हव्या त्या आकारात कापून घ्या. लहान कढईत तेल,जिरे,मोहरी,हिंग व कडीपत्त्याची  फोडणी करून टाका. अळु वडी तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

37 वर्षं गायब आहे बॉलिवूडमध्ये नावाजलेली मराठी अभिनेत्री; ऋषी कपूर यांच्यावर केलेले आरोप !

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

SCROLL FOR NEXT