Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी सोयाबीन इडली, एकदम सोपी आहे रेसिपी

सकाळी काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खाण्यावर अनेकांचा भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी रोज काय बनवावे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. सकाळी काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खाण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, रोजचे तेच तेच पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊन कंटाळा आलेला असतो.

शिवाय, सकाळच्या गडबडीत झटपट होणारा आणि आरोग्यासाठी हेल्दी असणारा नाश्ता करण्यावर अनेकांचा भर असतो. आज आम्ही अशीच एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे हेल्दी सोयाबीन इडली रेसिपी.

ही रेसिपी बनवायला जास्त वेळ ही लागत नाही आणि झटपट होते. चला तर मग जाणून घेऊयात पौष्टिक सोया इडलीची रेसिपी

हेल्दी सोयाबीन इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • इडलीसाठी लागणारा तांदूळ २ वाटी

  • उडदाची डाळ १ वाटी

  • सोयाबीन्स १ कप

  • मेथी दाणे १ चमचा

  • चवीनुसार मीठ

हेल्दी सोयाबीन इडली बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • ही रेसिपी बनवण्यासाठी सकाळी तांदूळ आणि सोयाबीन दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ५-६ तास भिजत ठेवा. त्यासोबतच उडीद डाळ आणि मेथी दाणे ५-६ तासांसाठी एका भांड्यात भिजत घाला.

  • त्यानंतर, रात्री हे भिजत घातलेली उडीद डाळ, तांदूळ आणि सोयाबीन मिक्सरला चांगले बारीक करून त्याचे इडली बॅटर तयार करून घ्या. हे चांगले एकजीव करून मिसळा.

  • त्यानंतर, हे बॅटर एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि रात्रभर तसेच राहुद्या.

  • सकाळी उठल्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या. मग, त्या साच्यात इडलीचे पीठ घालून इडली तयार करा.

  • त्यानंतर, नारळाची चटणीसोबत किंवा सांबरसोबत ही सोयाबीन इडली नाश्त्यामध्ये सर्व्ह करा. तुमचा हेल्दी आणि झटपट नाश्ता तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT