जर तुम्हाला नाश्त्याची झटपट रेसिपी हवी असे, तर हेल्दी आणि टेस्टी बनाना ओट्सची रेसिपी ट्राय करून पाहा. केळी आणि ओट्सपासून बनवलेला हा नाश्ता काही मिनिटांत तयार होईल. चला तर मग जाणून घेऊया बनवण्याची पद्धत-
1 कप ओट्स
1/2 कप दूध
1/2 कप पाणी
1 टेबलस्पून गूळ पावडर
4 ते 5 बदाम
1/2 केळी
सर्व प्रथम एका भांड्यात दूध आणि पाणी एकत्र करा.
जर तुम्हाला पाणी मिसळायचे नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक कप दूध घेऊ शकता.
आता दुधाचे भांडे मध्यम आचेवर ठेवा आणि उकळू द्या.
या दुधात ओट्स घालून चांगले मिसळा. त्यात गूळ पावडर किंवा पिठी साखर टाका .
ओट्स शिजल्यावर एका भांड्यात ठेवा.
बदामाचे छोटे तुकडे करून तव्यावर भाजून घ्या.
आता केळीचे छोटे तुकडे करा.
केळीचे तुकडे आणि भाजलेल्या बदामाने सजवलेले ओट्स सर्व्ह करा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात सफरचंद, स्ट्रॉबेरी किंवा आंबा यांसारखी इतर फळेही घालू शकता.