Recipe sakal
फूड

Breakfast Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी मिक्स्ड व्हेज पराठा, ही आहे सोपी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला मिक्स व्हेज पराठ्याची रेसिपी सांगणार आहोत. जाणून घ्या.

Aishwarya Musale

गरमागरम पराठ्यांचे नाव ऐकताच आपली भूक द्विगुणित होते. तुम्ही अनेक प्रकारचे पराठे खाल्ले असतील. पण आज आम्ही तुम्हाला भाज्यांपासून बनवलेल्या मिक्स व्हेज पराठ्याची रेसिपी सांगणार आहोत. हे पराठे पौष्टिकतेने परिपूर्ण आहेत. जर तुम्हाला मुलांना ब्रेकफास्टसाठी काही हेल्दी फूड द्यायचे असेल तर तुम्ही ते पटकन तयार करून त्यांना खायला देऊ शकता.

मिक्स व्हेज पराठा साहित्य

२ कप गव्हाचे पीठ

१ कप मिक्स व्हेजिटेबल भाज्या (गाजर, वटाणे, फ्लॉवर, बीन्स, शिमला मिरची)

1/2 टीस्पून लाल तिखट

१/२ टीस्पून गरम मसाला

पाणी (आवश्यकतेनुसार)

तूप किंवा तेल (पराठा तळण्यासाठी)

चवीनुसार मीठ

सर्वप्रथम गाजर, फ्लॉवर, बीन्स आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या. मटार सोलून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात २ कप गव्हाचे पीठ, बारीक चिरलेल्या मिक्स भाज्या, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून लाल तिखट आणि १/२ टीस्पून गरम मसाला एकत्र करा. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

यानंतर पिठाचे छोटे गोळे करून पराठे बनवा. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यावर थोडे तूप किंवा तेल लावा. तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर पराठा टाका. पराठ्याच्या दोन्ही बाजूंना तूप किंवा तेल लावून ते गोल्डन होईपर्यंत भाजा. उरलेले पराठे त्याच पद्धतीने भाजून घ्या.

आता तुमचे गरमागरम पराठे तयार आहेत. तुम्ही त्यांना गरम चहा, दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नीट'चा गोंधळ संपेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला दिलं अबुधाबीतलं परीक्षा केंद्र, पेपर द्यायला जायचं कुठे?

Chandrapur: आईचे काबाडकष्ट फळाला; मुलगा झाला डॉक्टर ! परिस्थितीवर केली मात; एका संघर्षमय जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Chhatrapati Sambhajinagar: पौसाची वाट बगू बगू, डोळ्यातलं पाणी आटायलंय! ६३ वर्षांच्या महिला शेतकऱ्याची व्यथा, आतापर्यंत दहा टक्केच पेरणी

Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट

SCROLL FOR NEXT