Healthy Food For Heart esakal
फूड

Healthy Food For Heart : हृदयाचं आरोग्य तंदुरुस्त ठेवा तेही हेल्दी स्नॅक्स खात, लगेच नोट करा रेसिपी

तुम्ही आतापर्यंत रत्याळ्याची चाट अनेक ठिकाणी खाल्ली असेल पण तुम्ही कधी रत्याळ्याची टिक्की ट्राय केली आहे काय?

सकाळ डिजिटल टीम

Healthy Food For Heart : रताळे हे एक आरोग्यदायी फळ असून याला स्लीट पोटॅटो असंही म्हणतात. रताळ्याचे सॅलेड किंवा चटनी किंवा चाट बववूनही खातात. तुम्ही आतापर्यंत रत्याळ्याची चाट अनेक ठिकाणी खाल्ली असेल पण तुम्ही कधी रत्याळ्याची टिक्की ट्राय केली आहे काय? आज आपण रत्याळ्याच्या टिक्कीची रेसिपी जाणून घेणार आहोत. ज्याने तुमच्या हृदयाचे आरोग्यही चांगले राहील.

रताळ्यांमध्ये फायबरची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यातही मदत होते. याशिवाय रताळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही फायद्याचे आहे. रत्याळ्याची टिक्की बनवायला सोपी आणि चवीला चटपटीत अशी आहे. तेव्हा जाणून घेऊया झटपट रेसिपी.

रताळ्याची टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

अर्धा किलो रताळे

१ कांदा

१ टोमॅटो

२ चमचे तेल

चवीनुसार मीठ

३ कापलेल्या हिरव्या मिर्च्या (Food)

रताळ्याची टिक्की कशी बनवायची?

रताळ्याची टिक्की बनवण्यासाठी प्रथम रताळे धुवून सोलून घ्या.

नंतर ते कापून चांगले उकळण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये ठेवा.

यानंतर कांदे, टोमॅटो आणि हिरवी मिरची सुद्धा धुवून चिरून घ्या.

नंतर एका भांड्यात उकडलेले रताळे काढून चांगले मॅश करा.

त्यानंतर बाकीचे सर्व साहित्य घालून चांगले मिसळा.

नंतर तयार केलेल्या पेस्टपासून गोल आकाराच्या टिक्की बनवून ठेवा.

यानंतर नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल टाकून गरम करा.

नंतर त्यावर टिक्की ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगली बेक करा. (Health)

आता तुमची स्वादिष्ट रताळ्याची टिक्की तयार आहे.

नंतर हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT