Healthy Momo Sakal
फूड

Healthy Momo: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून बनवा पौष्टिक मोमोज, जाणून घ्या रेसिपी

Healthy Momo: मोमोज अनेक लोकांचा लोकप्रिय पदार्थ आहे. पण मैदापासून बनवलेल्या मोमोजमुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे गव्हाच्या पिठाचा वापर करावा.

Puja Bonkile

Healthy Momo: मोमोज अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. पण मैदापासून बनवलेल्या मोमोजमुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की मोमोज हेल्दी असू शकतात, तर तुम्ही मान्य करणार का? तुम्हाला हेल्दी पद्धतीने मोमोज कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोमोज आरोग्यदायी असतात. गव्हाच्या पीठापासून बनवलेले मोमोज हे रस्त्यावर मिळणाऱ्या सामान्य मोमोजपेक्षा पौष्टिक असतात. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की गव्हाच्या पिठामुळे बनवलेले मोमोज चवदार लागत नाही तर असे चुकीचे आहे. कारण गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोमोज चवदार असून झटपट तयार होतात. चला तर मग जाणून घेऊया मोमोज कसे बनवायचे.

मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ

सोयाबीन वड्या

बारिक चिरलेला लसूण

मीठ

चिरलेली ब्रोकोली

आलं पेस्ट

हिरवी मिरची

मोमोज बनवण्याची कृती

सर्वात आधी गव्हाचे पीठ आणि मीठ मिक्स करावे. थोडे पाणी घालून पिठ चांगले मळून घ्यावे. नंतर एका भांड्यात बारिक चिरलेली कोबी, मोड आलेले कडधान्य, ब्रोकोली, आलं पेस्ट, लसूण, मिरची पेस्ट, मीठ आणि चिमूटभर साखर मिक्स करा. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्यावे.त्यात भाज्यांचे मिश्रण भरावे. त्याची घडी करून मोमोजचा आकार द्या. तुम्ही वाफवून किंवा तळून घेऊ शकता. मायो किंवा शेझवान चटणीसोबत गरमा गरमा मोमोज सर्व्ह करू शकता .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT