Traditional Indian Sweets With No Added Sugar: बऱ्याचजणांना जेवणानंतर किंवा मुळातच गोड खाण्याची फार आवड असते. पण अशावेळी आरोग्याचंही भान राखण तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ आवड आहे किंवा सवय आहे म्हणून जीभेचे चोचले पूरवण्यासाठी गोड खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणूनच आपल्याकडे जे पूर्वीपासून तयार होत असणारे पदार्थ खाल्यास पोषणमूल्य मिळण्यास मदत होते.
अशीच एक तुमच्या गोडाच्या चवीला पूर्ण करणारी आणि सोबतच तुमचे आरोग्य राखणारी नाचणीच्या लाडूंची रेसिपी आम्ही आज सांगणार आहोत. चला तर मग ही पोषणमूल्यांनी भरपर नाचणीच्या लाडूंची रेसिपी जाणून घेऊया.
नाचणीचे तुपावर भाजून केलेले पीठ, खजूर, खोबरे किस, भाजलेले शेंगदाणे, काजू आणि बदाम, वेलदोडे पावडर, तूप.
नाचणी स्वच्छ धुवून वाळवावी. ती साजूक तुपावर भाजून पीठ करावे. एक वाटी नाचणी पीठ, एक वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी शेंगदाणे, काजू आणि बदाम, थोडेसे खजूर बिया काढून हे सगळे पदार्थ साजूक तुपावर दहा मिनिटे मंद गॅसवर परतावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि चिरलेला गूळ घालावा.
खजूर असल्यामुळे गूळ जास्त लागत नाही आणि सर्व मिश्रण मिक्सरवर थोडे तूप घालून बारीक करावे आणि त्याचे लाडू करावेत. मिश्रण कोरडे वाटले, तर थोडे तूप घालू शकतो. नाचणीबरोबरच थोडे ज्वारी पीठ, कणीक, हरभरा डाळीचे पीठही घालू शकतो. मस्त पौष्टिक लाडू तयार होतात.
- अनघा फडणीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.