Til Tikki Recipe  esakal
फूड

Healthy Recipe :  तिळाची वडी तर नेहमीच खातो, तिळाची टिक्की कशी बनवायची माहितीय का?

तिळापासून बनलेली टिक्की ही ट्राय करून पहा

Pooja Karande-Kadam

Healthy Recipe :

नुकतेच एकमेकांना शुभेच्छा देत वर्षभर गोड बोलण्याचा सल्ला तूम्ही सगळ्यांना दिला असेल. या शुभेच्छांसोबत तिळाची वडी अन् तिळगुळही हातावर टेकवले असतील.तर आज आपण तिळापासून बनवला जाणारा अन् आपल्या आरोग्यासाठी पौष्टीक असलेला एक पदार्थ बनवणार आहोत.

हिवाळ्याच्या दिवसात शरीराला उबदार ठेवतील असे पदार्थ खाल्ले जातात. तिळामध्ये असलेली उष्णता आपल्यासाठी लाभदायक असते. त्यामुळेच संक्रांतीला तिळाचे पदार्थ खाल्ले जातात. तिळाच्या वड्या अन् लाडू बनवून खाल्ले असतील तर आता तिळापासून बनलेली टिक्की ही ट्राय करून पहा.

साहित्य

  • बटाटा - २ (उकडलेले)

  • तीळ - 1 कप (पांढरे)

  • पनीर - 1 कप (किसलेले)

  • कांदा - 1 (चिरलेला)

  • धणे - 1 कप (चिरलेला)

  • काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

  • चिली फ्लेक्स - 1 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - टिक्की तळण्यासाठी

  • चाट मसाला- 1 टीस्पून

कृती

तिळाची टिक्की बनवण्यासाठी आधी बटाटे सोलून उकळायला ठेवा. तसेच, कांदा बारीक चिरून घ्या. आता एका भांड्यात चिरलेला कांदा, हिरवे धणे, किसलेले चीज आणि सर्व मसाले घालून मिक्स करा. यानंतर तीळ घाला.

यानंतर चमच्याच्या मदतीने मॅश करा आणि सर्व साहित्य मिसळा. सर्व साहित्य नीट मिसळून झाल्यावर थोडे तेल घालून टिक्कीचा आकार द्या.

यावेळी गॅसवर नॉन-स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यावर तेल घालून टिक्की दोन्ही बाजूंनी मंद गॅसवर फ्राय करून घ्या.

टिक्की दोन्ही बाजूंनी तळून झाल्यावर ताटात काढून वरती चाट मसाला आणि हिरवी कोथिंबीर पसरवा. हिरव्या आणि लाल चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT