Holi 2024 esakal
फूड

Holi 2024 : होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ गोड पदार्थ, एकदम सोपी आहे रेसिपी

Holi 2024 : आज देशात सगळीकडे होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 : आज देशात सगळीकडे होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण आहे. देशात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आजच्या दिवशी होलिका दहन केले जाते. गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. होळीला नैवेद्य दाखवला जातो.

होळीला अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. देशातील अनेक राज्यांमध्ये होळीच्या विविध परंपरा आहेत. या परंपरा पाळून होळी साजरी केली जाते. त्यामुळे, खाद्यपदार्थांमध्ये ही विविधता पहायला मिळते. आज होळीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांच्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ तुम्ही होळीला घरच्या घरी बनवू शकता. कोणते आहेत हे पदार्थ चला तर मग जाणून घेऊयात.

करंजी

होळीला बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये या पदार्थाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात याला करंजी म्हणून ओळखले जात असले तरी इतर राज्यांमध्ये या पदार्थाला गुजिया म्हणून ओळखले जाते.

हा पदार्थ मावा, भांग, चॉकलेट, कोकोनट इत्यादी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बनवला जातो. चवीला गोड असणारा हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे. ही चविष्ट करंजी बनवण्यासाठी सर्वात आधी रवा आणि खवा भाजून घ्या. यामध्ये ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घाला. आता हे मिश्रण तयार झाल्यावर कणीक मळून घ्या.

ही कणीक मऊ असायला हवी. त्यानंतर, कणकेचे बारीक गोळे लाटून घ्या. हे गोळे लाटल्यानंतर, त्यात रवा किंवा खव्याचे मिश्रण भरा. करंजीच्या साच्यामध्ये करंजी बनवा किंवा तुम्हाला हवा असलेला आकार करंजीला द्या. तुमची चविष्ट करंजी तयार आहे.

रसमलाई

रसमलाई हा गोड पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. होळीच्या निमित्ताने घरच्या घरी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी दूध उकळून घ्या. त्या लिंबू पिळा जेणेकरून दुधाचे दही तयार होईल. आता दुधापासून दही तयार झाल्यावर सुती कपड्यात बांधून ते लटकून ठेवा. त्यातील अतिरिक्त पाणी संपल्यावर ते दही बारीक करण्यासाठी स्मॅश करा.

आता यापासून गोलाकार आकारातील गोळे बनवून घ्या. त्यानंतर, साखरेचा पाक बनवा. या साखरेच्या पाकात हे गोळे बुडवून ठेवा. त्यानंतर, एका कढईत दूध उकळून त्यात केशर आणि सुकामेवा घाला. थोडावेळ दूध उकळून घ्या. त्यानंतर, पाकातून गोळे काढून ते दुधात टाका. अर्धा तास असेच त्यात राहुद्या. जेणेकरून दूध चांगले शोषले जाईल. आता तुमची चविष्ट रसमलाई तयार आहे. त्यावर, ड्रायफ्रूट्स घालून सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

SCROLL FOR NEXT