chilli oil chilli oil
फूड

खाण्यातील स्वाद वाढवायचा असेल तर 'अशी' बनवा 'चिली ऑईल' रेसिपी

भारतात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचेच चायनीज फूड हे आवडते मेन्यू ठरत आहे

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: भारतात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचेच चायनीज फूड हे आवडते मेन्यू ठरत आहे. न्यूडल्स, पास्ता किंवा चायनीज स्नॅक्स आवडीने खाणारे खूप जण आहेत. या चायनीज फूडमध्ये भारतीय फ्लेवरही दिसतो. स्वतःच्या अंदाजात खाण्याच्या सवयीमुळे भारतीय फ्लेवर चायनीज फूडमध्ये दिसत आहे. चायनीज फूडसोबत चिली ऑईल (chilli oil) सर्व केले जाते. यामुळे खाण्यात अजून चव येते. बरेच लोक चिली ऑईल दुकानातून आणतात पण जर तुम्ही ते घरीही बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया चिली ऑईलची रेसिपी.

चिली ऑयल रेसिपी-

साहित्य-

चिली फ्लेक्स - 1 वाटी

मीठ - 2 चमचे

Sichuan मिरपूड - 4 चमचे

दालचिनी - १

ईलायची - 8

काळी वेलची - १

चक्री फूल - 5

तमालपत्र - 3

तेल - 2 कप

लसूण - 3 (चिरलेला)

आले - 1 तुकडा

- पहिल्यांदा चिली फ्लेक्स एका वाटीमध्ये घ्या आणि त्यात बीया कमी असतील याचे ध्यान ठेवा.

- चिली फ्लेक्सच्या ज्या वाटीत मीठ टाका. व्यवस्थित मीठ मिसळून ती वाटी बाजूला ठेवा.

- आता एका पॅनमध्ये तमालपत्र, Sichuan मिरपूड, दालचीनी, इलायची, काळी इलायची आणि चक्र फूल रोस्ट करून घ्या. हे एक ते दोन मिनीट भाजून घ्या आणि हे करपू नये याची काळजी घ्या.

- भाजल्यानंतर हे मसाले एका वाटीत काढून ठेवा. नंतर पॅन गॅसवर ठेवा आणि त्यात तेल टाका, गॅस मध्यम ठेवा.

- तेल थोडं गरम झाल्यावर त्यात भाजलेले मसाले टाका, त्यासोबत लसून-आले बारीक करून केलेली पेस्ट टाका. तसेच तुम्ही यात आले कापूनही टाकू शकता.

- हे मसाले १० ते १३ मिनीटे शिजवा नंतर त्यात चिली फ्लेक्स व्यवस्थित मिक्स करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT