Sakal - 2021-02-26T221810.007.jpg 
फूड

ही स्वीट डिश खातील मोठ्या चवीनं! घरच्या घरी ट्राय करा 'सफरचंद रबडी'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : 'रबडी' एक उत्तर भारतातील लोकप्रिय गोड पदार्थ. हा चविष्ट पदार्थ सणसमारंभांव्यतिरिक्त अन्य दिवशीही तयार करून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. अ‍ॅपल रबडी ही डिश सफरचंद, दूध, साखर, दालचिनी पावडर, काजू आणि बदाम या सामग्रींचा वापर करून तयार केली जाते. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून देखील हा पदार्थ तुम्ही सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अ‍ॅपल रबडी तयार करण्याची सोपी पद्धत..
 

महत्त्वाची सामग्री
750 mililitre फुल क्रीम मिल्क
आवश्यकतेनुसार साखर
आवश्यकतेनुसार बदाम
आवश्यकतेनुसार हिरवी वेलची
1 मोठ्या आकाराचे सफरचंद


अ‍ॅपल रबडी रेसिपी कशी बनवावी?
Step 1: सफरचंद सोलून घ्या
सफरचंदाची साल काढा आणि किसून घ्या. किसलेले सफरचंद बाजूला ठेवून द्यावे.
 

Step 2: दूध गरम करत ठेवा. यानंतर एका पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा. दूध घट्ट होईपर्यंत गरम होऊ द्यावे.
दूध


Step 3: किसलेले सफरचंद दुधात मिक्स करा.दूध घट्ट झाल्यानंतर त्यात किसलेले सफरचंद मिक्स करा. तीन ते चार मिनिटांनंतर त्यात साखर मिक्सर करा. दूध ढवळत राहा. यानंतर वेलची पावडर, दोन ते तीन बदामाचे कापलेले काप मिक्स करा आणि अ‍ॅपल रबडी शिजू द्यावी.

Step 4: तयार झाली आहे आपली अ‍ॅपल रबडी डिश. अ‍ॅपल रबडी गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही तुम्ही सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT