Egg
Egg Sakal
फूड

Eating Egg : हेल्दी राहण्यासाठी दिवसातून किती अंडी खावीत?

सकाळ डिजिटल टीम

Is It Safe To Eat Eggs Daily : उकडलेले अंडे किंवा ब्रेड ऑम्लेट हा केवळ परदेशातच नाही तर भारतातही बहुतेक लोकांचा आवडता नाश्ता बनला आहे. विशेषत: फिटनेस फ्रीक्स आणि वर्कआउट करणारे लोक अंड्याचे सेवन प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणून करतात.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

अंडी खाणे हे आरोग्यदायी मानले जात असले तरी, दररोज अंडी खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. अंडी ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, पण यामध्ये त्यात कोलेस्टेरॉलही अधिक प्रमाणात आढळते. यामुळेच बहुतेक फिटनेस तज्ज्ञ अंड्याचा पिवळा भाग काढून ते खाण्याचा सल्ला देतात. आज आपण रोज अंडी खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? याबद्दल जाणून घेणार आहोत.

अंडी :

दररोज अंडी खाणे किती सुरक्षित?

अंड्यांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. एका अंड्यामध्ये साधारणतः 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते, परंतु ते खाल्ल्याने शरीरात हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल असल्याचे मानले जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की, रोज अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाऊ शकते.

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. एका मोठ्या अंड्यामध्ये 6.30 ग्रॅम प्रथिने, 147 मिलीग्राम कोलीन, 0.53 मिलीग्राम व्हिटॅमिन ई, 2.05 ग्रॅम व्हिटॅमिन डी आणि फोलेट असते. जे शरीरात उपस्थित पेशी तयार करण्यात आणि दुरुस्त करण्यात मदतगार ठरू शकतात. त्याच वेळी व्हिटॅमिन ई आणि डी केस, त्वचा आणि हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

अंड्याचे फायदे

  • चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

  • त्वचा, केस आणि नखांसाठी फायदेशीर

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

  • दृष्टी सुधारते.

  • स्मरणशक्ती सुधारते.

  • हाडे मजबूत होतात.

  • हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रोज किती अंडी खाणे फायदेशीर?

अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात असले तरी, दररोज किती अंडी खावीत हे जाणून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. हेवी वर्कआउट आणि जिम करणाऱ्या व्यक्तींनी रोज 4-5 अंडी खाऊ शकतात. तर सामान्य लोक निरोगी राहण्यासाठी दिवसातून 2-3 अंडी खाऊ शकतात. अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु किती प्रमाणात खावे याबद्दल तुम्ही डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT