फूड

Recipe: गटारी स्पेशल! नक्की ट्राय करा 'हिरवं चिकन'

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या काही दिवसांमध्ये श्रावण महिना सुरु होणार आहे. एकदा श्रावण सुरु झाला की या काळात अनेक जण मांसाहार पूर्णपणे बंद करतात. त्यामुळेच श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी गटारी साजरी केली जाते. गटारी म्हणजे काय तर सलग २-३ दिवस नॉनव्हेजचं जेवण केलं जातं. यंदा गटारी अमावस्या रविवारी ८ ऑगस्टला आली आहे. त्यामुळे यंदाची गटारी स्पेशल करण्यासाठी हिरवं चिकन नक्की ट्राय करा. ( how-to-cook-green-Chicken-recipe-ssj93)

साहित्य -

चिकन ब्रेस्ट बोनलेस - १ मोठी वाटी (बारीक पीस करुन)

कांदा - १ मोठा

हिरव्या मिरच्या - ४

लसूण - ३-४ पाकळ्या

कोथिंबीर- १ वाटी

पुदिना - अर्धी वाटी

काजू - मुठभर

लिंबाचा रस - १ लहान वाटी

कसुरी मेथी - १ लहान वाटी

तमालपत्र - २

दालचिनी -१

वेलदोडे -२

जिरं - १ चमचा

तेल- आवश्यकतेनुसार,

मीठ - चवीनुसार

कृती -

१. एका मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ घाला व छान पेस्ट तयार करुन घ्या. दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यात बोनलेस चिकन घेऊन त्यावर लिंबाचा रस व तयार कोथिंबीर- पुदिन्याची पेस्ट टाका आणि अर्धा तास हे चिकन झाकून ठेवा.

२. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात जिरं, उभा चिरलेला कांदा, मिरची (आवड असल्यास) आणि काजूचे बारीक काप टाका व छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर पुन्हा या सगळ्याची पेस्ट तयार करुन घ्या.

३. पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात तमालपत्र, दालचिनी आणि वेलची घालून काही वेळ परतून घ्या. त्यानंतर त्यात कांदा व काजूची पेस्ट घाला आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. वाटण छान परतल्यानंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घाला आणि थोड थोडं पाणी घालून मंद आचेवर चिकन शिजू द्या. चिकन ८० टक्के शिजल्यावर त्यात कसूरी मेथी व मीठ घाला. पुन्हा एक वाफ काढा. अशा पद्धतीने गटारी स्पेशल हिरवं चिकन तयार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT