फूड

अस्सल गावरान चवीची भोपळ्याच्या पानांची भाजी; एकदा ट्राय कराच

स्नेहल कदम

श्रावण महिन्यात रेलचेल असणारी एक पालेभाजी म्हणजे, भोपळ्याच्या पानांची भाजी.

पालेभाज्या म्हटंल की अनेकजण नाक मुरडतात. मेथी, शेपू, चाकवत, पालक, पोकळा या भाज्यांना बरेचजण नापंसद करतात. हे खाताना अनेक कारण आणि नखरे तयार असतात. पावसाळा सुरु झाला की, विविध रानभाजांची मायंदाळी सुरु होते. यात चवळी, पातर, शेवगा, शेंडवल, कुरुड, घोळ अशा अनेक भाज्यांची नावे आपण ऐकली असाल. यातच श्रावण महिन्यात रेलचेल असणारी एक पालेभाजी म्हणजे, भोपळ्याच्या पानांची भाजी. एक वेलवर्गीय भाजी म्हणून याकडे पाहिले जाते. ही एक सोपी आणि कमी कालावधीत तयार होणारी भाजी आहे. ती स्वादिष्ट तर आहेच शिवाय या हंगामात शरीरासाठी उपयुक्तही आहे. या सोप्या रेसिपीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

साहित्य -

  • भोपळ्याची पाने - १५ ते २०

  • भिजवलेली तुर डाळ - पाव वाटी

  • भिजवलेली तांदळाची कणी - पाव वाटी

  • बारिक चिरलेली मिरची - ४

  • बारिक चिरलेला कांदा - ४

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • शेंगदाण्याचा कूट - आवश्यकतेनुसार

कृती -

सुरुवातीला भोपळ्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावी. वेलीवरुन ही पाने काढताना त्याचे देठ शक्यतो मोठे ठेवावे. त्यानंतर पाने उभी धरुन मागच्या बाजूने पानाच्या दाठावरुन खाली ओढत त्या पानाच्या शिरा काढून टाकाव्या. शिरा काढून झाल्या की, भाजी बारिक चिरुन घ्यावी. आता कढईत तेल गरम करायला ठेवावे. यानंतर त्यात कांदा आणि बारिक चिरलेली मिरची घालून भाजून घ्यावे. या मिश्रणात भाजलेल्या शेंगदाण्याचा (थोडा मोठा) कूट घालावा. मिश्रण हलवत रहावे. जेणेकरुण ते करपणार नाही. या मिश्रणात भिजवलेली तांदळाची कणी आणि तुर डाळ घालावी. शेवटी यात मीठ घालून या मिश्रणात थोडे पाणी घालावे. मंद आचेवर आणिवाफेवर ही भाजी शिजवू द्यावी. हिरव्यागार रंगाची तुमची भोपळ्यच्या पानांची भाजी तयार आहे. गरमा गरम भाकरीसोबत तुम्ही ही भोपळ्याची भाजी सर्व्ह करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT