Bajari Toast Recipe esakal
फूड

Bajari Toast Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी आणि हेल्दी बाजरी टोस्ट, नोट करा सोपी रेसिपी

Bajari Toast Recipe : बाजरी हे धान्य आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पोषकघटकांनी परिपूर्ण असलेल्या बाजरीचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते.

Monika Lonkar –Kumbhar

Bajari Toast Recipe : बाजरी हे धान्य आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पोषकतत्वांनी युक्त असलेल्या बाजरीचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. अनेक जण रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा जरूर समावेश करतात. बाजरीपासून केवळ भाकरी नाही तर इतर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी टोस्टचा ही समावेश आहे.

बाजरी टोस्ट तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये नक्कीच खाऊ शकता. खायला चवदार आणि आरोग्यासाठी हेल्दी असणाऱ्या बाजरीचा टोस्ट कसा बनवायचा? त्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात बाजरी टोस्टची सोपी रेसिपी.

बाजरी टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • ब्रेड स्लाईस

  • दही – अर्धा कप

  • बाजरीचे पीठ – १ कप

  • हिरवी मिरची बारीक चिरलेली

  • चवीनुसार मीठ

  • आल्याची पेस्ट – १ चमचा

  • १ शिमला मिरची बारीक चिरलेली

  • गाजर – २ चमचे बारीक चिरलेले

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • इनो पावडर – अर्धा चमचा

  • तूप – २ चमचे

बाजरी टोस्ट बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • बाजरी टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ घ्या.

  • आता या पीठामध्ये दही मिसळा आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • या मिश्रणात कोणतीही गुठळी राहता कामा नये, याची काळजी घ्या.

  • हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होता कामा नये. आता या मिश्रणात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • आता या मिश्रणात इनो पावडर घालून चांगले मिसळून घ्या.

  • आता एक ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यावर २ चमचे तयार मिश्रण लावून घ्या.

  • आता गॅसवर पॅन किंवा तवा ठेवा आणि त्यात २ चमचे तेल घालून गरम करा.

  • आता ज्या बाजूला पीठ लावले आहे ती बाजू सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • ही बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू अलगदपणे भाजून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी ब्रेड चांगला भाजल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

  • टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हा बाजरीचा टोस्ट खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT