Bajra Upma Recipe esakal
फूड

Bajra Upma Recipe : सकाळचा नाश्ता हेल्दी हवाय? मग, बनवा बाजरीचा स्वादिष्ट उपमा

हिवाळ्यात बाजरीचा आहारात समावेश करणे, हे अतिशय फायदेशीर मानले जाते. बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअमसारखे पोषकघटक आढळून येतात.

Monika Lonkar –Kumbhar

Bajra Upma Recipe : हिवाळ्यात बाजरीचा आहारात समावेश करणे, हे अतिशय फायदेशीर मानले जाते. बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअमसारखे पोषकघटक आढळून येतात. या पोषकघटकांमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

बाजरीची भाकरी बनवण्या व्यतिरिक्त तुम्ही बाजरीचा उपमा देखील बनवू शकता. हो तुम्ही वाचले ते अगदी खरे आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बाजरीचा उपमा देखील बनवू शकता. हा उपमा बनवायला अतिशय सोपा आणि हेल्दी आहे. चला तर मग जाणून घेऊयात बाजरीचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.

बाजरीचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ कप बाजरी

  • १ कप चिरलेला कांदा

  • ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • आले-लसूण पेस्ट

  • १ बारीक चिरलेला टोमॅटो

  • १ बारीक चिरलेला गाजर

  • अर्धा कप शिमला मिरची (बारीक चिरलेली)

  • तेल

  • चवीनुसार मीठ

  • जिरे-मोहरी

  • १ कप पाणी

  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)

बाजरीचा उपमा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • उपमा करण्याच्या एक दिवस आधी तुम्ही रात्रीच बाजरी चांगली धुवून ती रात्रभर पाण्यात भिजत ठेवा

  • सकाळी ही बाजरी उकडून घ्या.

  • आता एका मायक्रोवेव्हच्या बाऊलमध्ये तेलात जिरे, मोहरी, कांदा, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची, आले-लसणाची पेस्ट आणि शेवटी मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.

  • आता हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर साधारण ४-५ मिनिटे शिजवून घ्या.

  • हे मिश्रण शिजल्यानंतर ते बाहेर काढा आणि त्यात उकडलेली बाजरी आणि टोमॅटो घाला. आता पुन्हा हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि ३-४ मिनिटे पुन्हा शिजवून घ्या.

  • त्यानंतर, या मिश्रणात १ वाटी पाणी मिसळा आणि हे मिश्रण पुन्हा मायक्रोवेव्हला ५-६ मिनिटे शिजवून घ्या.

  • आता तुमचा बाजरीचा उपमा तयार आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तुमची डिश सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

  • या उपम्यावर लिंबू पिळा आणि लोणचे किंवा चटणीसोबत याचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT