फूड

Beetroot Pickle : बिटाचं लोणचं वाढवेल जेवणाची चव, पाहा ही सोपी रेसिपी

बिटाचं लोणचं बनवण्यासाठी नोट करा ही रेसिपी.

Aishwarya Musale

आपल्या सर्वांच्या घरात लोणचं असतं. जेवण चांगले बनवलेले असो वा खराब, लोणच्याचा आहारात समावेश केला तर जेवणाची चव चौपट वाढते.

भारतीय घरांमध्ये पराठा किंवा साध्या जेवणासोबत लोणचं दिलं जातं. हिवाळ्यात जेवणासोबत लोणचे खाणे अनेकांना आवडते. अनेकांना कैरीचे लोणचे तर काहींना मिरचीचे लोणचे आवडते.

हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही बीटरूट एकदा नाही तर अनेक वेळा खाल्ले असेल. बीटरूट देखील आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात अनेकांना त्याचा रस पिणे आवडते.

पण जर तुम्हाला विचारले की तुम्ही त्याचे लोणचे कधी खाल्ले आहे का, तर तुमचे उत्तर काय असेल? आज आम्ही तुम्हाला बीटरूटचे चवदार लोणचे कसे बनवू शकता ते सांगणार आहोत.

लागणारे साहित्य

बीटरूट - 500 ग्रॅम

लसूणच्या पाकळ्या - 5-6

कढीपत्ता - 5

आले - 1/2 इंच

हिरवी मिरची - ४ बारीक चिरून

हळद - 1/2 टीस्पून

लाल-काश्मिरी पावडर - 1/2 टीस्पून

मेथी दाणे - 1/2 टीस्पून

व्हिनेगर - 1 चमचा

चवीनुसार मीठ

हिंग - 1/2 टीस्पून

अमचूर पाउडर - 2 चमचे

मोहरीचे तेल - 1/2 कप

आचारी मसाला - २ चमचे

मोहरी - २ चमचे

बीटरूट लोणचे बनवण्याची सोपी रेसिपी

बीटरूट लोणचे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम बीटरूट सोलून त्याचे छोटे तुकडे करा.

बीटरूट कापल्यानंतर, किमान 1 दिवस उन्हात ठेवा. जास्त सूर्यप्रकाश नसल्यास, बीटरूट 2-3 दिवस सुकविण्यासाठी ठेवा. यामुळे लोणच्याची चव चांगली लागेल.

कढईत मोहरीचे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ओवा, लसूण, आले, मिरची, कढीपत्ता, हळद-तिखट घालून 10-15 मिनिटे चांगले परतून घ्या.

15 मिनिटे मसाले तळल्यानंतर, सर्व बीटरूटचे तुकडे पॅनमध्ये ठेवा आणि सुमारे 10 मिनिटे चांगले तळून घ्या. यानंतर पॅनमध्ये मीठ,आमचूर पावडर, आचारी मसाला, मेथीदाणा पावडर घालून चांगले मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा.

दुसर्‍या पॅनमध्ये १/२ कप मोहरीचे तेल घालून गरम करा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी सोडा.

यानंतर, बीटरूट व्यवस्थित तळून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थोडा वेळ थंड झाल्यावर लोणचे बरणीत टाका. आता त्यात गरम केलेले तेल घालून चांगले मिसळा आणि थोडा वेळ उन्हात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज! कितीने वाढणार पगार?

Karnataka Heavy Rain Alert : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Indians ने रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त करावे! IPL 2027 पूर्वी भारताच्या महान खेळाडूची मागणी, हार्दिक पांड्याचं भविष्य...

...म्हणून मंदिरात जीन्स परिधान केली; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा, ‘त्या’ ठिकाणी जाऊन घेतलं दर्शन

दिवाळीच्या मेकअपआधी त्वचेची घ्या अशी काळजी! फॉलो करा सेलिब्रिटी डायटिशिअन रुजुता दिवेकरांच्या ४ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT