Besan Bread Toast Recipe esakal
फूड

Besan Bread Toast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा स्वादिष्ट बेसन ब्रेड टोस्ट, एकदम सोपी आहे रेसिपी

Besan Bread Toast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी बेसन ब्रेड टोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय, हा पदार्थ झटपट तयार देखील होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Besan Bread Toast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी बेसन ब्रेड टोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. जवळपास प्रत्येक घरात सकाळी नाश्त्यामध्ये काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. कधीकधी सकाळी उठायला उशीर होतो. मग, अशावेळी झटपट मात्र, तितकेच हेल्दी बनवण्याचे टेंन्शन असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बेसन ब्रेड टोस्ट नाश्त्याला बनवू शकता.

या बेसन ब्रेड टोस्टचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते चवीला स्वादिष्ट असले तरी ते बनवायला अवघे काही मिनिटे लागतात. नाश्त्याशिवाय, तुम्ही मुलांच्या टिफिनला ही हा पदार्थ बनवू शकता. कशी आहे याची रेसिपी? चला तर मग जाणून घेऊयात.

बेसन ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ब्रेड स्लाईस – ६

  • १ कप बेसन

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टोमॅटो बारीक चिरलेले

  • किसलेला १ बटाटा

  • लाल तिखट – १ चमचा

  • चाट मसाला – अर्धा चमचा

  • गरम मसाला – अर्धा चमचा

  • बेकिंग सोडा – १ चमचा

  • तेल

  • चवीनुसार मीठ

बेसन ब्रेड टोस्ट बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • बेसन ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात चाळलेले बेसन घ्या.

  • आता या बेसनमध्ये लाल तिखट, गरम मसाला, बेकिंग सोडा, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्या.

  • आता यामध्ये थोड थोड पाणी घालून बेसनाचे मिश्रण घट्ट करा.

  • या बेसनाच्या पीठात चिरलेला कांदा, किसलेला बटाटा, चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • आता दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवा.

  • तेल गरम झाले की, एक ब्रेडचा स्लाईस घ्या. तो बेसनाच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी बुडवून घ्या.

  • त्यानंतर, तळण्यासाठी कढईमध्ये ठेवा.

  • आता तेलात हा ब्रेड दोन्ही बाजूंनी १-२ मिनिटांसाठी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • ब्रेड कुरकुरीत तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.

  • नाश्त्यासाठी तुमचा स्वादिष्ट बेसन ब्रेड टोस्ट तयार आहे.

  • हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हा बेसन ब्रेड टोस्ट गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT