Besan Poha Cutlet esakal
फूड

Besan Poha Cutlet : नाश्त्याला झटपट बनवा स्वादिष्ट बेसन पोहा कटलेट, एकदम सोपी आहे रेसिपी

Besan Poha Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही बेसन आणि पोह्यांपासून एक चवदार पदार्थ बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Besan Poha Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज पोहे, इडली, उपमा, शिरा इत्यादी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे, सकाळी नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळे करून खाण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्ही सकाळी बेसन आण पोह्यांपासून एक टेस्टी पदार्थ बनवू शकता.

या पदार्थाचे नाव बेसन पोहे कटलेट होय. खायला अतिशय चवदार आणि खुसखुशीत लागणारा हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही झटपट हा पदार्थ बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात बेसन पोहे कटलेट बनवण्याची ही सोपी रेसिपी.

बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • पोहे ३ वाट्या

  • बेसन १ वाटी

  • रवा १ कप

  • बारीक चिरलेला कांदा २

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • लाल तिखट १ चमचा

  • हळद अर्धा चमचा

  • जिरे पावडर १ चमचा

  • चाट मसाला १ चमचा

  • तेल आवश्यकतेनुसार

  • चवीनुसार मीठ

बेसन पोहे कटलेट बनवण्याची सोपी पद्धत

  • चवदार बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे ५-७ मिनिटे पाण्यात भिजवा.

  • तोपर्यंत बेसन एका पॅनमध्ये कोरडे भाजून घ्या.

  • आता त्यात रवा, हिरवी मिरची, जिरेपूड, हळद, लाल तिखट, हिरवी कोथिंबीर आणि मीठ घाला.

  • आता भाजलेले बेसन थंड झाल्यावर हे मिश्रण पोह्यात घालून चांगले मळून घ्या.

  • आता तुमच्या तळहातावर थोडे तेल लावून पोह्यांच्या मिश्रणाला हवा तसा आकार द्या.

  • आता कटलेट बनवून झाल्यावर गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, तेलात मंद आचेवर कटलेट तळून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी कटलेट सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • आता तुमचे गरमागरम कटलेट तयार आहेत. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT