Bharli Vangi sakal
फूड

Bharli Vangi Recipe : महाराष्ट्रीयन स्टाईल भरली वांगी अशी करा; सर्वच तुमचे फॅन होणार

जर तुम्ही आज भरली वांगी बनविण्याचा बेत आखत असाल तर ही रेसिपी नक्की वाचा.

सकाळ डिजिटल टीम

Bharli Vangi : दररोज काय स्पेशल जेवणात करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. अनेकदा आपण नवीन काहीतरी ट्राय करण्याच्या नादात आपलीच स्पेशिअॅलिटी विसरतो. जसे की भरली वांगी. महाराष्ट्रीयन भरली वांगी म्हटलं तर तोंडाला पाणी सुटणारचं. जर तुम्ही आज भरली वांगी बनविण्याचा बेत आखत असाल तर ही रेसिपी नक्की वाचा. (how to make vangi bhaji recipe maharashtrian style read story)

साहित्य :

  • १०-१२ काटेरी लहान वांगी

  • दोन मोठे कांदे

  • दोन टेबलस्पून सुकं खोबरं

  • दोन टेबलस्पून तीळ

  • दोन टेबलस्पून दाण्यांचं कूट

  • अर्धा कप चिरलेली कोथिंबीर

  • अर्धा कप ओलं खोबरं

  • दोन चमचे धनेपूड

  • एक चमचा टेबलस्पून सोया जिरेपूड

  • एक टेबलस्पून काळा मसाला

  • तिखट, मीठ, हळद

  • थोडा गूळ

  • चिंचेचा कोळ

कृती-

वांग्यांना चीर पाडून पाण्यात घाला.

एक कांदा चिरून व सुकं खोबरं भाजून घ्या.

तीळ भाजून कूट करा.

सर्व साहित्य एकत्र करा.

त्यात सोया कांदा किसून एकत्र करा.

ओलं खोबरं, कोथिंबीर इत्यादी सर्व एकत्र करून वांग्यात भरा.

तेलाची खमंग फोडणी बनवून दोन डाव फोडणी बाजूला काढा.

फोडणीत भरली वांगी घाला.

झाकणावर पाणी घालून शिजवा.

वाढण्यापूर्वी ठेवलेली फोडणी व कोथिंबीर पेरून वाढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT