Bread Pulao Recipe Sakal
फूड

Bread Pulao Recipe: छोटीशी भूक लागल्यास झटपट तयार करा ब्रेड पुलाव, जाणून घ्या रेसिपी

Bread Pulao Recipe: दुपारची छोटीशी भूक घालवण्यासाठी झटपट बनवा ब्रेड पुलाव

Puja Bonkile

Bread Pulao Recipe: अनेकवेळा पोटभर नाश्त्या करून देखील भूक लागते. अशावेळी छोटीशी भूक घालवण्यासाठी ब्रेडपासून चवदार पुलाव बनवू शकता. ब्रेड सर्वाच्याच घरी असते. याचा वापर करून चवदार पदार्थ बनवल्यास छोटीशी भूक लगेच घालवू शकता. ब्रेड पुलाव बनवणे सोपा आहे आणि कमी वेळेत तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया ब्रेड पुलावा कसा बनवावा.

ब्रेड पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तेल - 2 चमचे

जिरं - 1 चमचे

मोहरी - 1 टीस्पून

हिरवी मिरची - 1 टीस्पून

कांदा - 1 बारिक चिरलेला

मीठ - 1/2 टीस्पून

हळद - 1/4 टीस्पून

लाल मिरची - 1/4 टीस्पून

धणे पावडर - 1/4 टीस्पून

गरम मसाला - 1/4 टीस्पून

टोमॅटो - 60 ग्रॅम

शिमला मिरची - 60 ग्रॅम

थोडे पाणी

पांढऱ्या ब्रेडचे तुकडे -

टोमॅटो सॉस- 1 टीस्पून

भाजलेले शेंगदाणे - सजावटीसाठी

ब्रेड पुलाव बनवण्याची कृती

ब्रेड पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी पांढऱ्या ब्रेडचे तुकडे करावे. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात जिर, मोहरी,हिरवी मिरची,कांदा गालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात हळद,लाल तिखट,धनेपावडर, गरम मसाला घालून २ मिनिट शिजवावे. नंतर त्यात पांढऱ्या ब्रेडचे तुकडे टाकावे. नंतर २ मिनिटे झाकून ठेवावे.नंतर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढा आणि कोथिंबिर शेंगदाणे टाकून आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT