Chana Dal Ladu Recipe esakal
फूड

Chana Dal Ladu Recipe : हरभरा डाळीपासून झटपट बनवा मऊसूत लाडू

Chana Dal Ladu Recipe : आपल्याकडे गोड पदार्थांचे शौकिन असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातल्या त्यात लाडू खायला तर सगळ्यांनाच आवडते.

सकाळ डिजिटल टीम

भावना गंधिले

Chana Dal Ladu Recipe : आपल्याकडे गोड पदार्थांचे शौकिन असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातल्या त्यात लाडू खायला तर सगळ्यांनाच आवडते. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना लाडू खायला आवडते. लाडूंचे असंख्य प्रकार देखील आहेत. मोतीचूर लाडू, डाळीचे लाडू, शेवचे लाडू, रव्याचे आणि बेसनाचे लाडू इत्यादी लाडूचे असंख्य प्रकार आहेत.

आज आम्ही तुम्हाला लाडूची अशीच एक सुंदर रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी आहे हरभरा डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या लाडूची. चला तर मग जाणून घेऊयात हरभरा डाळीच्या लाडूची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • दोन वाट्या भिजवलेली हरभरा डाळ

  • साजूक तूप,

  • दीड वाटी पिठी साखर

  • वेलदोडा पावडर

  • काजू, बदाम,

  • केसर

हरभरा लाडू करण्याची सोपी पद्धत :

  • दोन तास हरभरा डाळ भिजवून घ्यावी.

  • भिजलेली डाळ मिक्सरला बारीक करून घ्यावी.

  • नंतर डाळीच्या पेस्टचे गोळे तुपात सोडून तळून घ्यावे.

  • तळलेले गोळे थंड झाल्यावर छान मोकळे करून घ्यावे. त्यात दीड वाटी पिठीसाखर, वेलदोडा पावडर, केसर, काजू, बदाम घालून लाडू वळून घ्यावे.

  • तयार लाडूवर काजूचे तुकडे ठेवून सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणा

Dajipur Sanctuary Rain : फोंडा घाट, दाजीपूर अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस; चंदगड तालुक्यालाही पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT