Chili Garlic Paratha esakal
फूड

Chili Garlic Paratha : नाश्त्याला झटपट बनवा चिली गार्लिक पराठा, पोट ही भरणार आणि चवदारही होणार!

Chili Garlic Paratha : आतापर्यंत तुम्ही बटाट्याचा, पालकचा, मेथीचा किंवा मिक्स व्हेज पराठा खाल्ला असेल. परंतु, तुम्ही कधी चिली गार्लिक पराठा खाल्ला आहे का?

Monika Lonkar –Kumbhar

Chili Garlic Paratha : भारतीय स्वयंपाकघरात सकाळच्या नाश्त्यामध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पराठा होय. पोहे, उपमा, शिरा, इडली या व्यतिरिक्त नाश्त्यामध्ये पराठे आवर्जून खाल्ले जातात. परंतु, रोज नाश्त्याला हेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. नाश्त्याला काहीतरी टेस्टी आणि वेगळे खाण्याची इच्छा होते. त्यासाठी पराठा हा उत्तम पर्याय आहे.

पराठ्यांमध्ये असंख्य प्रकार आहेत. त्यामुळे, पराठा बनवण्यासाठी विविध ऑप्शन्स उपलब्ध होतात. आतापर्यंत तुम्ही बटाट्याचा, पालकचा, मेथीचा किंवा मिक्स व्हेज पराठा खाल्ला असेल. परंतु, तुम्ही कधी चिली गार्लिक पराठा खाल्ला आहे का? हा पराठा बनवायला अतिशय सोपा आहे.

शिवाय, हा पराठा बनवायला जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही आणि फार कमी साहित्यामध्ये हा पराठा बनवला जाऊ शकतो. सकाळच्या गडबडीत तुम्ही नाश्त्याला चिली गार्लिक पराठा बनवू शकता. हा पराठा कसा बनवायचा? चला तर मग जाणून घेऊयात ही सोपी रेसिपी.

चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • १०-१५ लसणाच्या पाकळ्या

  • गव्हाचे पीठ

  • तेल

  • हिरवी मिरची बारीक चिरलेली

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • चवीनुसार मीठ

  • तीळ

चिली गार्लिक पराठा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या.

  • आता या पीठामध्ये तेल, मीठ, आणि तीळ आणि पाणी घालून पीठ मिक्स करा.

  • पीठ चांगले मळून घेतल्यानंतर, ते १५-२० मिनिटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवा.

  • तोपर्यंत दुसऱ्या बाजूला एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या घालून याची पेस्ट बनवा.

  • आता गव्हाच्या पीठाचे गोळे बनवा आणि पराठा लाटायला घ्या.

  • गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा आणि त्यात लाटलेला पराठा घाला.

  • या पराठ्यावर लसणू-मिरची आणि कोथिंबीरची केलेली पेस्ट चमच्याच्या मदतीने पराठ्यावर पसरवा.

  • आता पराठ्याला दोन्ही बाजूंनी तूप किंवा बटर लावून पराठा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • तुमचा चिली गार्लिक पराठा तयार आहे. आता या गरमागरम पराठ्यासोबत टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT