Christmas 2023 esakal
फूड

Christmas 2023 : ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी बनवा चोको लावा केक, एकदम सोपी आहे रेसिपी

ख्रिसमससाठी चोको लावा केक कसा बनवायचा? ते जाणून घेऊयात.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. सर्वत्र ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे. ख्रिसमस ट्री, सजावटीच्या गोष्टी, विविध प्रकारचे केक्स आणि खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टींची नुसती रेलचेल पहायला मिळत आहे.

या सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी होताना दिसत आहे. ख्रिसमसला विविध प्रकारचे केक्स हमखास बनवले जातात. लहान मुलांना विशेष आवडणारा चोको लावा केक देखील या दिवसांमध्ये आवर्जून बनवला जातो.

आज आम्ही तुम्हाला खास ख्रिसमससाठी घरच्या घरी बनवता येणाऱ्या चोको लावा केकची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चोको लावा केकची रेसिपी.

चोको लावा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • डार्क चॉकलेट – १ कप

  • मैदा – अर्धा कप

  • ४ अंडी

  • बटर अर्धी वाटी

  • आयसिंग शुगर १०० ग्रॅम

चॉकलेट लावा केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी चॉकलेट आणि बटर वेगवेगळ्या भांड्यात काढून ते वितळून घ्या.

  • त्यानंतर, हे दोन्ही घटक वितळले की, दोन्ही वेगळ्या भांड्यात काढून घ्या.

  • आता १ भांडे घ्या, त्यामध्ये २ अंडी फोडून घ्या. अंड्यातील फक्त पिवळा भाग घ्या.

  • आता ही दोन्ही अंडी चांगली फेटून घ्या.

  • आता या फेटलेल्या अंड्यांमध्ये पिठीसाखर घाला.

  • आता वितळलेले चॉकलेट आणि बटर मिक्सरमध्ये बारीक करा. जेणेकरून ते एकत्रितपणे चांगले मिक्स होऊ शकेल.

  • आता या मिश्रणात राहिलेल्या २ अंड्यांचा पिवळा भाग टाका आणि मैदा ही घाला. आता पुन्हा हे सर्व मिक्सरला बारीक करा.

  • जेणेकरून ते चांगल्या प्रकारे एकत्र होईल. जेणेकरून यात गुठळ्या राहू नयेत.

  • आता केकचे भांडे घ्या, त्याला तूप किंवा बटर लावून घ्या.

  • आता या केकच्या भांड्यात मिक्सरला बारीक केलेले वरील मिश्रण घाला.

  • आता हा केक ओव्हनला २०० डिग्रीवर बेक करायला ठेवा. हा केक अर्धवट बेक झाल्यानंतर यात चॉकलेटचे तुकडे घाला.

  • त्यानंतर, पुन्हा २० मिनिटांसाठी केक बेक करा. तुमचा चोको लावा केक तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT