Christmas 2023 esakal
फूड

Christmas 2023 : ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी बनवा चॉकलेट स्पंज केक, एकदम सोपी आहे रेसिपी

ख्रिसमससाठी चॉकलेट स्पंज केक कसा बनवायचा? ते जाणून घेऊयात.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : सध्या मार्केटमध्ये ख्रिसमसची लगबग पहायला मिळत आहे. मार्केटमध्ये ख्रिसमस ट्रीच्या डेकोरेशनचे साहित्य, विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू, सांताक्लॉज ड्रेस, टोप्या आणि खाद्यपदार्थ इत्यादींची नुसती रेलचेल पहायला मिळत आहे.

ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी खास करून विविध प्रकारचे केक्स बनवले जातात आणि ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते. जर तुम्हाला खास ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी चॉकलेट स्पंज केक बनवायचा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊयात चॉकलेट स्पंज केक बनवण्याची सोपी आणि टेस्टी रेसिपी.

चॉकलेट स्पंज केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ कप मैदा

  • दही १ कप

  • कोको पावडर – अर्धा कप

  • बेकिंग सोडा - १ चमचा

  • बेकिंग पावडर (अंदाजानुसार)

  • व्हॅनिला इसेन्स - १ चमचा

  • बटर – अर्धा कप

  • डार्क चॉकलेट – १ क्यूब

  • साखर – ३/४ कप

  • व्हिप क्रीम (आवश्यकतेनुसार)

  • चवीनुसार मीठ

चॉकलेट स्पंज केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एक मोठे भांडे घ्या. त्यामध्ये दही घाला आणि साखर घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. जेणेकरून साखर चांगली विरघळू शकेल.

  • त्यानंतर, दुसऱ्या एका भांड्यात मैदा चाळून घ्या. आता त्यामध्ये कोको पावडर  घाला आणि तुमच्या आवश्यकतेनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगले मिक्स करा.

  • आता दह्याच्या मिश्रणात बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करून बाजूला ठेवा.

  • त्यानंतर, १० मिनिटांनी त्यात बटर आणि कॉफी पावडर मिसळा. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून हळूहळू मैद्याच्या मिश्रणात मिक्स करा.

  • आता हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. त्यानंतर केकचे भांडे घ्या.

  • त्या केकच्या भांड्याला बटर किंवा तूप लावून घ्या आणि त्यामध्ये केकचे हे बॅटर त्यात घाला.

  • आता हा केक ओव्हनला १८० डिग्रीवर अर्ध्या तासासाठी बेक करायला ठेवा.

  • जवळपास अर्ध्या तासानंतर तुमचा चॉकलेट स्पंज केक तयार असेल. त्यानंतर, हा केक तुम्ही व्हिप क्रीमने हवा तसा सजवा आणि डार्क चॉकलेट क्रश करून केकवर घाला.

  • आता तुमचा चॉकलेट स्पंज केक तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलींना रात्री बाहेर पडू दिलं नाही पाहिजे, गँगरेप प्रकरणी ममता बॅनर्जींचं वादग्रस्त विधान

दिवाळीचं मोठं गिफ्ट! करा स्वस्तातले 'हे' मोबाईल रिचार्ज; फ्रीमध्ये मिळेल Netflix आणि JioHotstar, अनलिमिटेड डेटा, कॉल अन् बरंच काही

Delhi Police Recruitment 2025: 12वी उत्तीर्ण उमेदवार, तयारी लागा! SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात 7565 कॉन्स्टेबल पदांची भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

'तु माझ्या आयुष्यात...' प्राजक्ता माळीने मानले 'या' खास व्यक्तीचे आभार, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'यंदाचं वर्ष तुझ्यामुळे...'

Bank Fraud: बँक खात्यातून साडेआठ कोटींची फसवणूक; यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार व गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT