Cheesy Corn Puffs sakal
फूड

Cheesy Corn Puffs Recipe: रोज तेच ते खाऊन कंटाळा आलाय, मग ट्राय करा कॉर्न-चीज पफ!

आम्ही तुमच्यासाठी कॉर्न-चीज पफ्सची झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.

Aishwarya Musale

पाहुणे घरी येणार असले तर त्यांना काय करायचे हा प्रश्न नेहमीच सतावतो. अशावेळी तेच तेच पोहे, सामोसे बनवले जातात. पाहुणेही घरी आणि बाहेरही तेच खाऊन कंटाळतात. वेगळे काहीतरी ट्राय करायचे असेल तर बेकरी सारखे कॉर्न-चीज पफ नक्की बनवा.

विकेंड आला की काहीतरी वेगळे खावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळेच विकेंडला पिझ्झा हट्जवर गर्दी होते. पण, प्रत्येकवेळी बाहेर जाऊन खाणे शक्य नसते. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी कॉर्न-चीज पफ्सची झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहीत्य

  • १ कप मैदा

  • १ कप कॉर्न

  • २ टेबल स्पून मेयोनीज

  • १/२ कप चीज

  • १ टी स्पून मीठ

  • १ टी स्पून काळे मिरे

  • १ टी स्पून लाल तिखट

कृती

सर्वप्रथम थोडे मीठ घालून मैदा मळून घ्या.

एका भांड्यात कॉर्न उकडून घ्या.

कॉर्नमध्ये मेयोनीज, मीठ, मिरपूड आणि लाल तिखट मिसळा.

या मिश्रणात चीज खिसून घाला.

पिठाच्या लहान गोलाकार गोळे करून त्यात मधोमध हे मिश्रण भरा.

सर्व पिठाचे आणि मिश्रणाचे पूर्ण गोलाकार गोळा करून घ्या.

हे गोळे तूम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा तळू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Innovation : भारताची रेल्वेमध्ये नवी क्रांती; जगात पहिल्यांदाच इलेक्ट्रीक डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे धावली, अमेरिका, चीनलाही टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठाच्या भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना जारी केली जाणार

Koyna River Drowning: कोयना नदीत पोहणे ठरले जीवघेणे; १२ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू, पाण्याचा अंदाज चुकला अन् काळाने घातला घाला

वयाच्या ११व्या वर्षी दगडाच्या खाणीत काम, नंतर पत्नीच्या पगारावर चालायचा घरखर्च, आज नाना पाटेकर आहेत कोट्यवधींचे मालक

Monsoon Update: मान्सून अचानक थांबला! महाराष्ट्रात पाऊस कधी? मुंबई-पुणेकरांची प्रतीक्षा वाढली, हवामान विभागाची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT