Corn Cheese Sandwich esakal
फूड

Corn Cheese Sandwich : नाश्त्याला झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न चीज सॅंडवीच, एकदम सोपी आहे रेसिपी

Corn Cheese Sandwich : कॉर्न खायला तर सगळ्यांनाच आवडते. कॉर्नपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Corn Cheese Sandwich : कॉर्न खायला तर सगळ्यांनाच आवडते. कॉर्नपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. कॉर्नला मराठीत मका असे म्हटले जाते, या मक्याचे कणीस सर्वजण अगदी चवीने खातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना कॉर्नपासून बनवलेले विविध पदार्थ जसे की, कॉर्न सूप, कॉर्न पिझ्झा, कॉर्न टोस्ट खायला आवडते.

परंतु, तुम्ही कधी घरच्या घरी कॉर्न आणि चीजचा वापर करून सॅंडवीच बनवले आहे का? जर नसेल बनवले तर आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. सकाळच्या नाश्त्यामध्ये खायला हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आज आम्ही तुम्हाला कॉर्न-चीज सॅंडवीच कसे बनवायचे? त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही सोपी रेसिपी.

कॉर्न-चीज सॅंडवीच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ब्रेड स्लाईस

  • मेयोनीज

  • शेजवान सॉस

  • १ कांदा

  • टोमॅटो

  • शिमला मिरची

  • कॉर्न – १ वाटीभर

  • चीज

  • चवीनुसार मीठ

  • चिली फ्लेक्स

  • ऑरिगॅनो

  • बटर

कॉर्न-चीज सॅंडवीच बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी सॅंडवीचमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्या धुवून घ्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारात बारीक चिरून घ्या.

  • त्यांतर, कॉर्न कुकरला उकडून घ्या.

  • ही सर्व तयारी झाल्यानंतर, आता एका बाऊलमध्ये सर्व भाज्या, स्वीट कॉर्न, मेयोनीज,शेजवान सॉस, मीठ, चिमूटभर लाल तिखट किंवा काळी मिरी पावडर मिसळा.

  • हे सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्या. आता तुमचे ब्रेडसाठीचे स्टफिंग तयार आहे.

  • आता ब्रेडच्या स्लाईसवर हे स्टफिंग लावून घ्या आणि त्यावर चिज किसून घ्या.

  • आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा, या तव्यावर बटर पसरून घ्या आणि त्यावर हे ब्रेड ठेवून १ मिनिटासाठी शिजून घ्या.

  • मध्यम आचेवर हे सॅंडवीच चांगले भाजून घ्या.

  • तुमचे गरमागरम चीजी कॉर्न सॅंडवीच तयार आहे. आता हे सॅंडवीच नाश्त्याला खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT