Corn Poha Recipe esakal
फूड

Corn Poha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न पोहे, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

Corn Poha Recipe : आतापर्यंत तुम्ही साधे पोहे, बटाटा पोहे खाल्ले असतील परंतु, कॉर्न पोहे तुम्ही कधी खाल्ले आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

Corn Poha Recipe : सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खायला सगळ्यांनाच आवडतात. स्ट्रीट फूडमध्ये तर पोह्यांचे असंख्य प्रकार पहायला मिळतात. घरच्या घरी पोहे बनवताना साधे पोहे आणि बटाटा पोह्यांना हमखास प्राधान्य दिले जाते. कारण, सकाळच्या गडबडीमध्ये झटपट होणारा नाश्ता म्हणजे पोहे होय.

आतापर्यंत तुम्ही साधे पोहे, बटाटा पोहे खाल्ले असतील परंतु, कॉर्न पोहे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? जर नसतील खाल्ले तर नाश्त्याला कॉर्न पोहे नक्की ट्राय करा. हे पोहे बनवायला अतिशय सोपे आहेत. शिवाय, चवीला हे पोहे उत्तम लागतात. सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही हे पोहे पटकन बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कॉर्न पोह्यांची ही सोपी रेसिपी.

कॉर्न पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप कॉर्न

  • १ कांदा चिरलेला

  • १ टोमॅटो चिरलेला

  • अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट

  • २ कप पोहे

  • लाल तिखट – १ चमचा

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • अर्धा चमचा हळद

  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

  • जिरे-मोहरी अर्धा चमचा

  • आवश्यकतेनुसार तेल

  • चवीनुसार मीठ

  • लिंबाचा रस

  • कढीपत्ता

कॉर्न पोहे बनवण्याची सोपी पद्धत :

  • कॉर्न पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवा आणि १५ मिनिटांसाठी भिजवा.

  • तोपर्यंत एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मक्याचे दाणे(कॉर्न) उकळून घ्या. मक्याचे दाणे उकडले की गॅस बंद करा.

  • आता गॅसवर पॅन किंवा कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घाला.

  • तेल गरम झाले की, त्यात जिरे-मोहरी, कढीपत्ता घाला. त्यानंतर आले-लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो घालून हलक्या हाताने परतून घ्या.

  • कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर, त्यात लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले हलवून घ्या.

  • आता त्यात उकडलेले कॉर्न घाला. एक ते दोन मिनिटे परतून झाल्यावर त्यात पोहे घाला. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • आता या पोह्यांवर लिंबाचा रस घाला आणि एक मिनिटांनंतर गॅस बंद करा.

  • तुमचे गरमागरम कॉर्न पोहे तयार आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT