how to make crispy rava and potato dosa 
फूड

Rava Dosa Recipe : डाळ-तांदूळ भिजवण्याची झंझंट नकोच, रवा अन् बटाट्याचा बनवा क्रिस्पी डोसा

रोजच्या घाईगडबडीत महिला वर्गाला प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे सकाळच्या नाश्त्याचा. त्यासाठीच खास रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

रोजच्या जीवनात कधीही टाळू नये तो आहार म्हणजे सकाळचा नाश्ता. नाश्त्यामुळे दिवसभर उत्साही राहण्यासाठी मदत होते. त्यामुळं सकाळचा नाश्ता हा भरपूर पोषकतत्वं असलेला असावा असं अनेक आहार तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे घरातील महिलावर्गाला नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे काय बनवायचं. त्यात कामाला जाणाऱ्या महिला वर्गाचा गोंधळ अधिक होत असतो. पण याच घाईगडबडीत तुम्हाला काहीतरी टेस्टी झटपट ना बनवायचा असेल तर तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत. रवा अन् बटाट्याचा डोसा. कसा बनवायचा जाणून घेऊ.

रवा अन् बटाट्याचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा अर्धा कप (घरातील व्यक्तींनुसार)

२ बटाटे (घरातील व्यक्तींनुसार)

२ हिरव्या मिरच्या

मीठ चवीनुसार

अडीच कप पाणी

अर्धा कप तांदळाचे पीठ

बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेली कोथिंबीर

जिरे

बारीक केलेली लाल मिरची

डोसा बनवण्याची कृती

रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी बटाटे सोलून धुवून घ्या. त्यानंतर बटाट्याच्या फोडी करुन घ्या. त्यानंतर बटाट्याचे तुकडे, हिरवी मिरची, मीठ घालून पेस्ट तयार करा. पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.

त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा घालू शकता. आता हे पीठ थोडे पातळ करा. जेणेकरून चमच्याने ते पसरवता येईल. नॉनस्टिक पॅनवर चमचाच्या साहाय्याने पीठ टाका आणि नीट पसरवा. अवघ्या काही मिनिटातचं तुमचा क्रिस्पी डोसा तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT