Curd Sandwich esakal
फूड

Curd Sandwich : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

Curd Sandwich : सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला काहीतरी सोपे आणि टेस्टी बनवायला सगळ्यांनाच आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Curd Sandwich : सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला काहीतरी सोपे आणि टेस्टी बनवायला सगळ्यांनाच आवडते. बरं दररोज पोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे, काहीतरी चवदार आणि हेल्दी खाण्याला सगळ्यांचे प्राधान्य असते. सॅंडविच हा एक असा पदार्थ आहे की, जो सकाळच्या गडबडीमध्ये लवकर बनवला जाऊ शकतो. या सॅंडविचचे अनेक प्रकार आहेत.

या प्रकारांपैकीच एक असलेला चवदार पदार्थ म्हणजे दही सॅंडविच होय. हे दही सॅंडविच सोप्या पद्धतीने कसे बनवायचे? त्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात दही सॅंडविच बनवण्याची ही सोपी रेसिपी. हे दही सॅंडविच सकाळी नाश्त्यामध्ये खाण्यासोबतच तुम्ही मुलांच्या टिफिनला ही देऊ शकता.

दही सॅंडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ वाटी दही

  • ब्रेडचे स्लाईस

  • बटर

  • लाल तिखट १ चमचा

  • चवीनुसार मीठ

  • काळी मिरी पावडर १ चमचा

  • चाट मसाला १ चमचा

  • बारीक चिरलेला कांदा १

  • बारीक चिरलेला टोमॅटो १

  • बारीक चिरलेली शिमला मिरची १

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

दही सॅंडविच बनवण्याची सोपी पद्धत :

  • दही सॅंडविच बनवायला अतिशय सोपे आहे. हे सॅंडविच बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये दही घ्या.

  • हे दही चमच्याच्या मदतीने चांगले फेटून घ्या.

  • आता या फेटलेल्या दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घाला.

  • सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतल्यानंतर, त्यामध्ये मीठ, लाल तिखट,  काळी मिरी पावडर, चाट मसाला हे सर्व मिसळा.

  • त्यानंतर, दही पुन्हा चांगले एकजीव करून घ्या.

  • आता या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा चांगले मिसळून घ्या.

  • आता तुमचे दही सॅंडविचचे मिश्रण तयार आहे. एका ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण लावून घ्या.

  • त्यानंतर, दुसरा ब्रेड त्यावर ठेवून द्या.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा किंवा पॅन गरम करायला ठेवा. त्यात बटर घाला आणि यामध्ये ब्रेडचे स्लाईस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • तुमचे दही सॅंडविच तयार आहे. हे गरमागरम सॅंडविच टोमॅटो सॉस आणि हिरव्या पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : ९ फूट लांबीच्या अजगराचे थरारक रेस्क्यू; धारावीतील नॅचरल पार्क परिसरात सर्पमित्र पोलिसाची धाडसी कामगिरी

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT