Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा अंड्याचा स्वादिष्ट पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये अंडी खाण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. मात्र, अंड्याचे ऑम्लेट करण्याव्यतिरिक्त आणखी वेगळी रेसिपी काय करणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. बरं रोज ते पोहे, उपमा, शिरा, दाक्षिणात्य पदार्थ आणि पराठे खाऊन कंटाळा आलेला असतो. या थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खावे असे प्रत्येकाला वाटते.

थंडीच्या दिवसांमध्ये अंडी खाण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. मात्र, अंड्याचे ऑम्लेट करण्याव्यतिरिक्त आणखी वेगळी रेसिपी काय करणार?  असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, आता तुमच्यासाठी अंड्याची एक वेगळी ब्रेकफास्ट रेसिपी आज आम्ही घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे अंडा पराठा. हा पराठा करायला ही अतिशय सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊयात अंडा पराठ्याची रेसिपी.

अंडा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • ३-४ अंडी

  • ४-५ हिरव्या मिरच्या

  • ५०० ग्रॅम गव्हाचे पीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • तेल

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • चवीनुसार मीठ

अंडा पराठा बनवण्याची योग्य पद्धत

  • अंडा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात किंवा परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या.

  • त्यात मीठ आणि तेल मिसळून चांगली कणीक मळून घ्या.

  • आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये ३-४ अंडी फेटून घ्या. या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिसळा.

  • आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्या.

  • एका बाजूला गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा. हा पॅन गरम होईपर्यंत मळलेल्या कणीकचे बारीक गोळे बनवून घ्या.

  • त्यानंतर, हे गोळे लाटून घ्या. आता ही लाटलेली चपाती तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून हलकी भाजून घ्या.

  • त्यानंतर, या चपातीच्या एका बाजूला अंड्याचे मिश्रण हलक्या हाताने पसरवून घ्या.

  • त्यानंतर, हे अंड्याचे मिश्रण शिजेपर्यंत चपाती चांगली भाजून घ्या. तुमचा स्वादिष्ट अंडा पराठा तयार आहे.

  • हा गरम पराठा तुम्ही लोणच्यसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT