Healthy Breakfast Recipe  esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या हरभऱ्याचे स्पेशल चाट, एकदम सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यात मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध होतात. त्यापैकीच एक असलेला हिरवा हरभरा हा सर्वांना खायला आवडतो.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : हिवाळ्यात मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध होतात. त्यापैकीच एक असलेला हिरवा हरभरा हा सर्वांना खायला आवडतो. मकरसंक्रांतीच्या सणापूर्वीच या हिरव्या हरभऱ्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागते.

हिरवा हरभरा तसाच खाल्ला ही जातो आणि या हरभऱ्याची मस्त भाजी ही बनवली जाते. ही भाजी चवीला आंबट-गोड लागते. अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असलेल्या या हिरव्या हरभऱ्यापासून भाजी, चाट, कोशिंबीर आणि पराठा इत्यादी खाद्यपदार्थ बनवले जातात.

कॅल्शिअम, जीवनसत्वे आणि खनिजांचा भरपूर समावेश असलेला हिरवा हरभरा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आज आपण या हिरव्या हरभऱ्याचे चाट कसे बनवायचे?  त्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

हिरव्या हरभऱ्याचे चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • हिरवा हरभरा – २०० ग्रॅम

  • बटाटे : १-२ उकडून बारीक चिरून घ्या

  • जिरे – १ चमचा

  • हिंग – अर्धा चमचा

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टॉमॅटो बारीक चिरलेला

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • १ काकडी बारीक चिरलेली

  • चाट मसाला – १ चमचा

  • लाल तिखट – अर्धा चमचा

  • लिंबाचा रस

  • तेल

  • चवीनुसार मीठ

हरभऱ्याचे चाट बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे  :

  • सर्वात आधी हरभरे कुकरला १ शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्या.

  • त्यानंतर, एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात, फोडणीला जिरे-हिंग टाका. त्यानंतर, शिजवून घेतलेले हरभरे घाला. त्यात मीठ मिसळा.

  • आत या मिश्रणात बारीक चिरलेला बटाटा घालून त्यावर लाल तिखट घातल्यानंतर, मिश्रण जरावेळ शिजू द्या.

  • त्यानंतर, हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

  • त्यानंतर, यावर चाट मसाला टाकून मिक्स करून घ्या. तुमचे हिरव्या हरभऱ्याचे चविष्ट चाट तयार आहे.

  • हे चाट तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT