Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी गाजर पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यात हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता करायचा असेल तर गाजरचे पराठे नक्कीच ट्राय करा.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : देशात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे, सकाळी नाश्त्यामध्ये गरमागरम पराठा खायला लोकांची पसंती असते. नाश्त्यामध्ये मेथीचे आणि बटाट्याचे पराठे नेहमीच बनवले जातात. मात्र, हिवाळ्यात जर तुम्हाला काही हेल्दी आणि पौष्टिक ट्राय करायचे असेल तर तुम्ही गाजराचे पराठे नक्कीच ट्राय करायला हवेत.

गाजराचे पराठे करण्याची रेसिपी अतिशय सोपी आणि सिंपल आहे. चला तर मग जाणून घेऊयात या टेस्टी आणि हेल्दी गाजर पराठ्याची रेसिपी.

गाजर पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • गव्हाचे पीठ २ कप

  • किसलेले गाजर २

  • आल्याचा तुकडा

  • जिरे पावडर

  • हिरवी मिरची

  • लाल तिखट

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • चवीनुसार मीठ

  • पांढरे तीळ

  • आवश्यकतेनुसार तूप

गाजर पराठा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये थोडे तूप, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, जीरे-पावडर, मीठ, आल्याचा तुकडा आणि तीळ घाला त्यानंतर शेवटी किसून घेतलेले गाजर घाला.

  • त्यानंतर, या पीठात थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.

  • मळून घेतल्यानंतर हे पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा.

  • त्यानंतर, गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा आणि या पीठाचे बारीक गोळे करा.

  • आता तुम्ही पराठा लाटून घ्या आणि गरम तव्यावर तूप लावून पराठा भाजून घ्या.

  • टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत तुम्ही हा पराठा ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT