Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा पौष्टिक बाजरीची इडली, एकदम सोपी आहे रेसिपी

आपल्या सर्वांना रोजच्या नाश्त्यामध्ये इडली खायला आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सध्या सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमध्ये आपण सर्वांनी आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे आहे. आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या रेसिपीज देखील ट्राय करतो.

इडली हा प्रकार आपल्या सर्वांना रोजच्या नाश्त्यामध्ये खायला आवडतो. इडली खाल्ली की पोट देखील भरलेले राहते आणि फारशी भूक देखील लागत नाही. या दिवसांमध्ये इडली खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. मात्र, तुम्ही कधी बाजरीची इडली खाल्ली आहे का?

तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. मात्र, तुम्ही बाजरीपासून पौष्टिक इडली बनवू शकता. ही पौष्टिक इडली बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि शिवाय, ही इडली बनवायला फार साहित्याची गरज भासत नाही.

आज आम्ही तुम्हाला या पौष्टिक बाजरीच्या इडलीची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही पौष्टिक बाजरी इडलीची रेसिपी.

बाजरीची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • २ कप बाजरी

  • ताक – २ कप

  • एनो – चिमूटभर

  • मीठ – चवीनुसार

  • काळी मिरी पावडर – १ चमचा

बाजरीची इडली बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी बाजरी चांगल्या प्रकारे निवडून स्वच्छ करून घ्या.

  • त्यानंतर, एका मोठ्या भांड्यात बाजरी ठेवा.

  • आता त्यात २ कप ताक घालून साधारण २ तास भिजत ठेवा.

  • त्यानंतर, काळी मिरी आणि मीठ त्यात मिसळा.

  • आता या बॅटरमध्ये थोडा खायचा इनो घालून पीठ चांगल्या प्रकारे फेटून घ्या.

  • त्यानंतर, इडली बनवण्याचे भांडे घ्या. त्याला तेल लावून घ्या आणि त्यात बाजरी इडलीचे बॅटर घाला.

  • आता इडलीचे भांडे गॅसवर १५-२० मिनिटांसाठी ठेवा.

  • त्यानंतर, इडली शिजली की नाही ते चेक करा.

  • इडली शिजल्यानंतर गॅस बंद करून चटणीसोबत गरमागरम, पौष्टिक इडली सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT