Banana Toast Recipe esakal
फूड

Banana Toast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी बनाना टोस्ट, एकदम सोपी आहे रेसिपी

सकाळच्या नाश्तामध्ये काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खावे, असे अनेकांना वाटते. त्यासाठी, तुम्ही बनाना टोस्टची रेसिपी नक्कीच बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Banana Toast Recipe : रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. बरं रोजचा तोच नाश्ता जसे की, पोहे, उपमा, इडली आणि सॅंडविच इत्यादी पदार्थ खाऊन बोअर होत. या थंडीच्या दिवसांमध्ये काही तरी हेल्दी आणि चविष्ट खावे, असे अनेकांना वाटते.

आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी सांगणार आहोत. जी सकाळच्या गडबडीमध्ये बनवायला अतिशय सोपी असून खायला देखील चविष्ट आहे. या रेसिपीचे नाव आहे बनाना टोस्ट. चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी.

बनाना टोस्ट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ केळी (बारीक चिरलेले स्लाईसमध्ये)

  • २ ब्राऊन ब्रेड स्लाईस

  • २ चमचे पीनट बटर

  • १ चमचा भाजलेले शेंगदाणे

बनाना टोस्ट बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा.

  • तवा किंवा पॅन गरम झाल्यानंतर तुमचे ब्राऊन ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

  • आता हे ब्रेड स्लाईसेस भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या.

  • या दोन्ही डिशवर १ चमचा पीनट बटर लावून घ्या.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर फ्रूट जॅम देखील लावू शकता.

  • आता यावर केळ्याचे चिरलेले स्लाईसेस ठेवा.

  • या केळीच्या स्लाईसेसवर थोडेफार भाजलेले शेंगदाणे ठेवा.

  • तुमचा टेस्टी आणि हेल्दी बनाना टोस्ट रेडी आहे.

  • सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा सायंकाळी चहासोबत तुम्ही हा बनाना टोस्ट नक्कीच ट्राय करू शकता.

  • सकाळच्या गडबडीमध्ये करण्यासारखा हा एक बेस्ट हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे. त्यामुळे, तुम्ही सुद्धा ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT