Oats Dosa Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : ओट्स खाऊन कंटाळा आला? मग, नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी ओट्स डोसा

ओट्स हे पचायला हलके असतात आणि यात पौष्टिक घटक भरपूर असतात.

Monika Lonkar –Kumbhar

Oats Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक जण ओट्स खाण्याला प्राधान्य देतात. ओट्समुळे आपल्या शरीराचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय, ओट्स हे पचायला हलके असतात आणि यात पौष्टिक घटक भरपूर असतात.

त्यामुळे, खास करून वजन कमी करण्यासाठी देखील ओट्सचा आहारात आवर्जून समावेश केला जातो. मात्र, सतत ओट्स खाऊन अनेकांना कंटाळा येतो. आज आम्ही नाश्त्यासाठी झटपट होणारी आणि हेल्दी अशी ओट्स डोश्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही हेल्दी रेसिपी

ओट्स डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ कप ओट्स

  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ

  • १ चमचा दही

  • चवीनुसार मीठ

  • १ चमचा तेल

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • कांदा चिरलेला

  • १ चमचा जिरे

  • आवश्यकतेनुसार कोथिंबीर

ओट्स डोसा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी ओट्स आणि तांदूळ एका भांड्यात भिजवा. हे दोन्ही घटक मऊ झाल्यावर त्यातील पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.

  • आता ओट्स आणि तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे बारीक करताना त्यात पाणी घालू नका.

  • आता बारीक केलेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, कांदा आणि इतर साहित्य घालून चांगले मिक्स करा.

  • गॅसवर पॅन ठेवून त्यात १ चमचा तेल आणि जिरे घाला.

  • हे जिरे तडतडल्यावर त्यात डोश्याचे बॅटर घालून डोसा पसरवा. १ मिनिटांपर्यंत शिजल्यावर डोसा उलटा करा.

  • डोश्याच्या दोन्ही बाजू हलक्या सोनेरी झाल्यावर तुमचा डोसा प्लेटमध्ये काढून घ्या.

  • आता, तुमचा हेल्दी ओट्स डोसा तयार आहे. सांबर किंवा नारळाच्या चटणीसोबत मस्त सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांचा उंबरखिंडीत लढतानाचा AI व्हिडिओ व्हायरल! फक्त ४ तासांत इतिहास उलटला, २५ हजार मुघल गारद

"मेरे लाईफ में हिरो की एंट्री हो गयी है"; तुला पाहते रे फेम गायत्री दातारच्या आयुष्यात खऱ्या विक्रम सरंजामेची एंट्री !

Maharashtra Politics : पुढील दोन महिन्यांत मोठा राजकीय बदल; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील - ॲड. प्रकाश आंबेडकर!

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Latest Marathi News Live Update: सातारा बामणोलीत ड्रग्ज छापा

SCROLL FOR NEXT