High Protein Sprouts Salad esakal
फूड

High Protein Sprouts Salad : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी स्प्राऊट्स सॅलेड, जाणून घ्या सोपी रेसिपी

High Protein Sprouts Salad : ही सॅलेडची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. शिवाय, यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज भासणार नाही.

Monika Lonkar –Kumbhar

High Protein Sprouts Salad : आजकाल अनेक जण आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक झाले आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा आहार हा संतुलित आणि हेल्दी असण्याला प्राधान्य दिले जात आहे. जर तुम्हाला ही सकाळचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला एका हाय प्रोटिन्सनेयुक्त असलेल्या स्प्राऊट सॅलेडची रेसिपी सांगणार आहोत.

ही सॅलेडची रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. शिवाय, यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज भासणार नाही. चवदार असण्यासोबतच हे सॅलेड प्रथिनांनी परिपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊयात हिरव्या मुगाच्या सॅलेडची सोपी रेसिपी.

हिरव्या मुगाचे स्प्राऊट सॅलेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • अर्धा कप अंकुरित हिरवे मूग

  • बारीक चिरलेली शिमला मिरची १

  • बारीक चिरलेला कांदा १

  • बारीक चिरलेला टोमॅटो १

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • अर्धा कप ओल्या नारळाचा किस

  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं

  • १ चमचा तेल

  • अर्धा चमचा चिली फ्लेक्स

  • १ चमचा काळी मिरी

  • चवीनुसार मीठ

  • २ चमचे लिंबाचा रस

हिरव्या मुगाचे स्पाऊट सॅलेड बनवण्याची योग्य पद्धत

  • सर्वात आधी सर्व हिरवे मूग पाण्यात भिजत घाला. ४-५ तासांनंतर त्यातील पाणी काढून टाका.

  • त्यानंतर, एका सूती कापडामध्ये हे हिरवे मूग गुंडाळून ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याला मोड येतील.

  • हिरव्या मुगाला मोड आल्यानंतर, त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, नारळाचा किस, हिरवी मिरची, आलं हे सर्व साहित्य घालून मिक्स करून घ्या.

  • त्यानंतर, यामध्ये तेल, चिली फ्लेक्स, मीठ, काळी मिरी आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळून घ्या.

  • आता तुमचे हाय प्रोटिन्सयुक्त हिरव्या मुगाचे स्प्राऊट सॅलेड तयार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT