बेचव अन्नाला चवदार बनवण्याचे काम मसाला करतो. चिमूटभर मसालाच्या वापरानं पदार्थ खूप चवदार बनतात. बाजारात मिळणारे मॅगी तर आपण खातोच, पण मॅगीला चविष्ट बनवणारा हाच मसाला जर घरी बनवता आला तर किती बरं होईल ना..
जर तुम्हाला वाटत असेल की मॅगी मसाल्यामध्ये काही वेगळे घटक असतात, आणि त्यामुळेच पदार्थांना चव येते तर तसं अजिबात नाही. हा मसाला तुम्ही घरच्या घरीदेखील बनवू शकता. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा वापर करून मॅगी मसाला तयार करता येतो..चला तर मग आज जाणून घेऊया, मॅगी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा याविषयी.
साहित्य- ३ चमचे कांदा पावडर, ३ चमचे लसूण पावडर, अडीच चमचे कॉर्न फ्लॉवर, १ चमचा मिरची पावडर, २ चमचे आमचूर पावडर, दीड छोटे चमचे (टिस्पून) सुक्या आल्याची पूड, ३ टिस्पून चिली फ्लेक्स, १ टिस्पून हळद, २ चमचे जिरे, ३ चमचा काळी मिरी , १ टीस्पून मेथी दाणे, ३-४ लाल मिरच्या, २ चमचे संपूर्ण कोथिंबीर, २ तमालपुत्र, चवीनुसार मीठ
कृती -सर्वप्रथम जिरे, मेथी दाणे, तमालपत्र, धणे, संपूर्ण मिरची, काळी मिरी, २ तास उन्हात ठेवा ओलावा दूर होईल. थोड्या वेळाने पॅन गरम झाल्यावर त्यात सर्व मसाले टाका आणि मंद आचेवर ४-५ मिनिटे तळून घ्या.नंतर हे मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड करा.संपूर्ण मसाले थंड झाल्यावर त्यांना बारीक वाटून घ्या.या मसाल्यात कांदा पावडर, लसूण पावडर, कॉर्नफ्लोर, आंब्याची पावडर, साखर, कोरडे आले, हळद, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून पुन्हा बारीक वाटून घ्या. हा मसाला चाळणीतून चाळून घ्या. आता तुमचा मॅगी मसाला तयार आहे. आता जेव्हाही तुम्ही घरी मॅगी बनवाल तेव्हा हा होममेड मॅगी मसाला वापरा.