Massor Dal Vada Recipe esakal
फूड

Massor Dal Vada Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसूर डाळ वडा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Massor Dal Vada Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत काहीतरी वेगळे आणि क्रिस्पी खाण्याची सगळ्यांची इच्छा असते.

Monika Lonkar –Kumbhar

Massor Dal Vada Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत काहीतरी वेगळे आणि क्रिस्पी खाण्याची सगळ्यांची इच्छा असते. कारण, रोजच्या नाश्त्यातील पोहे, उपमा, शिरा, पराठा खाऊन अनेकांना बोअर झालेले असते. त्यामुळे, नाश्त्याला वेगळा पर्याय शोधला जातो. जर तुम्हाला ही नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळा आणि चवदार पदार्थ खायचा असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा वडा कसा बनवायचा? त्याची रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ बनवायला फार साहित्याची गरज पडत नाही आणि झटपट बनवून तयार देखील होतो. चला तर मग जाणून घेऊयात मसूर डाळीच्या वड्याची रेसिपी.

मसूर डाळीचा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मसूर डाळ १ वाटी

  • बारीक चिरलेला कांदा

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • काळी मिरी पावडर अर्धा चमचा

  • तळण्यासाठी तेल

  • लसूणच्या पाकळ्या ४-५

  • बारीक चिरलेलं आलं

  • चवीनुसार मीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

मसूर डाळीचा वडा बनवण्याची सोपी पद्धत

  • सर्वात आधी मसूर डाळ ३-४ वेळा धुवून घ्या. त्यानंतर, एका भांड्यात ही डाळ भिजत घाला. सुमारे १ तास ही डाळ अशीच भिजू द्या.

  • त्यानंतर, मसूर डाळीतील पाणी काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ, लसूणच्या पाकळ्या, आलं, हिरवी मिरची आणि थोडेसे पाणी घालून याची घट्ट पेस्ट बनवून घ्या.

  • त्यानंतर, एका मोठ्या बाऊलमध्ये ही मसूरची पेस्ट काढून घ्या. त्यात, मीठ, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून पीठ चांगले मिक्स करून घ्या.

  • आता गॅसवर कढई किंवा पॅन गरम करायला ठेवा. त्यात तळण्यासाठी तेल घाला.

  • तेल मंद आचेवर गरम झाले की, आता डाळीचे मिश्रण चमच्याने बाहेर काढून पॅनमध्ये घाला. ते हळूवारपणे दाबा, परंतु, ते जास्त सपाट किंवा चपटे करू नका. वड्याचा गोल आकार टिकून रहायला हवा, याची काळजी घ्या.

  • आता दोन्ही बाजूंनी मसूर डाळीचा वडा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

  • त्यानंतर, हे मसूर डाळीचे वडे टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT