Pickle Recipes Sakal
फूड

Pickle Recipes : हिवाळ्यात खा गाजर-मुळ्याचं चटपटीत लोणचं! जाणून घ्या सोपी रेसिपी

हिवाळ्यात गाजर-मुळ्याचं लोणचं कधी ट्राय केलं आहे का? आज आपण गाजर आणि मुळ्याचे लोणचे कसे करायचे याची सविस्तर रेसिपी जाणून घेणार आहोत.

Aishwarya Musale

Know This Simple Recipe for Spicy Carrot-Radish Pickle

हवामान थोडं थंड झालं की लोणचं बनवलं जातं. हिवाळा येताच बाजारात हंगामी भाज्यांची आवक सुरू होते. लोणच्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. भारतीय जेवण लोणच्याशिवाय अपूर्ण आहे. लोणचे हे अनेकांचे आवडते असते. लिंबूचे, कैरीचे, मुळ्याचे अशी अनेक प्रकारची लोणची आपण विकत आणतो किंवा घरी तयार करत असतो.

हिवाळ्यात तुम्ही गाजर आणि मुळ्याची कोशिंबीर खाल्ली असेलच. हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अनेकजण गाजर, मुळ्याची भाजीही खातात. पण हवं तर गाजर आणि मुळ्याचं लोणचंही खाऊ शकता.

गाजर आणि मुळ्याचे लोणचे खूप चवदार आणि पौष्टिक आहेत. हे लोणचं तुम्ही रोटी, पराठ्यासोबत खाऊ शकता. आज आपण गाजर आणि मुळ्याचे लोणचे कसे करायचे याची सविस्तर रेसिपी जाणून घेणार आहोत.

लागणारे साहित्य (Materials required)

  • गाजर

  • मुळा

  • मिरच्या

  • तेल

  • मोहरी

  • जिरे

  • मेथी

  • काळी मिरी

  • धणे

  • हळद मिरची पावडर

  • मीठ

  • ओवा

  • आमचूर पावडर

कृती: (Action)

सर्वप्रथम प्रथम गाजर, मुळा आणि मिरच्या चांगल्या प्रकारे धुवून कापडाने पुसून घ्या. त्यानंतर त्यांचे लांब तुकडे करा.

आता कढईत तेल गरम करा त्यात चिरलेल्या मिरच्या तळून घ्या.

यानंतर त्यात गाजर आणि मुळ्याचे तुकडे टाका. 4-5 मिनिटे शिजवा. आता त्याचा मसाला तयार करा. त्यासाठी मोहरी, जिरे, मेथी, काळी मिरी, धणे चांगले परतून घ्या.

भाजल्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर गाजर, मुळा आणि मिरच्यांमध्ये हळद, मिरची पावडर, मीठ, ओवा, आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करा.

आता त्यात वाटलेला मसाला घाला आणि हे सर्व चांगले मिसळा.

त्यानंतर थोडा वेळ शिजवा. आता हे तयार मसालेदार लोणचे तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT