

Government IPO Plan: Modi Government Prepares to List 3 PSU Companies in FY 2026-27
eSakal
Modi government upcoming IPO plan: मोदी सरकार आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये तीन सरकारी कंपन्या शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी IIFCL आणि कोल इंडियाच्या दोन उपकंपन्या महानदी कोलफिल्ड्स (MCL) आणि साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स (SECL) यांचा समावेश आहे. याशिवाय, सरकार दुसरा पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच InvIT आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे नवे पर्याय उपलब्ध होऊ शकतात.