Jowar Appe Recipe esakal
फूड

Jowar Appe Recipe : ज्वारीच्या पिठापासून झटपट बनवा चवदार अप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

Jowar Appe Recipe : ज्वारीच्या पीठापासून आपण भाकरी, धिरडे आणि थालीपीठ बनवतो.

Monika Lonkar –Kumbhar

Jowar Appe Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज खायला काय करावे? असा मोठा प्रश्न सगळ्यांना पडतो. पोहे, इडली, उपमा, शिरा हे नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. या दिवसांमध्ये तर काहीतरी चमचमीत आणि भन्नाट खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. परंतु, हा पर्याय पौष्टिक अन् चवीला उत्तम असावा. अगदी तसाच एक पर्याय म्हणजे ज्वारीच्या पीठीचे अप्पे होय.

ज्वारीच्या पीठाचे अप्पे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. ज्वारीच्या पीठापासून आपण भाकरी, धिरडे आणि थालीपीठ बनवतो. परंतु, तुम्ही कधी ज्वारीच्या पिठापासून अप्पे बनवले आहेत का? जर नसतील बनवले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊयात ज्वारीच्या पिठाचे अप्पे बनवण्याची ही सोपी रेसिपी.

ज्वारीचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • १ वाटी ज्वारीचे पीठ

  • १ वाटी दही

  • १ कोबी बारीक चिरलेला

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ गाजर बारीक चिरलेले

  • १ शिमला मिरची बारीक चिरलेली

  • १ चमचा लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट

  • हळद

  • ओवा

  • इनो

  • तेल

  • चवीनुसार मीठ

ज्वारीचे अप्पे बनवण्याची सोपी पद्धत

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचे पीठ घ्या. आता या पीठामध्ये १ वाटी दही मिसळा हे मिश्रण चांगले मिसळून घ्या.

  • त्यानंतर, यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, ओवा, बारीक चिरलेले गाजर, कोबी, शिमला मिरची, कांदा आणि लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट पेस्ट घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात भाज्या मिसळू शकता.

  • त्यानंतर, त्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण चांगले हलवून घ्या.

  • ५-१० मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवा.

  • तोपर्यंत दुसऱ्या बाजूला गॅसवर अप्पेपात्र गरम करायला ठेवून त्याला तेल लावून घ्या.

  • आता ज्वारी अप्प्यांच्या मिश्रणाचे झाकण काढून त्यात १ चमचा इनो घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • आता चमचाभर बॅटर अप्पेपात्रात सोडून ते ५-७ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

  • आता दोन्ही बाजूंनी वाफेवर अप्पे शिजवून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत अप्पे शिजवून घेतल्यानंतर ते प्लेटमध्ये गरमागरम सर्व्ह करा.

  • कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत हे ज्वारीचे अप्पे सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT