फूड

Diwali Festival 2021 : करा कुरकुरीत कडबोळी

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत ज्याप्रमाणे आवडीने चकल्या केल्या जातात त्याप्रमाणे कडबोळ्याही केल्या जातात. या कडबोळ्या खुसखुशीत होणे गरजेचे असते. अनेकांना कडबोळ्या दह्याबरोबर खायला आवडतात. आज बघू कडबोळ्यांची रेसिपी.

त्यासाठी आधी भाजणी करून घेऊ

भाजणीचे साहित्य- तांदूळ चार वाट्या, पिवळे हरभरे - सालासकट, उडीद - गहू - ज्वारी - बाजरी प्रत्येकी एक वाटी, धणे अर्धी वाटी, जिरे पाव वाटी.

कृती- सर्व धान्ये निवडून वेगवेगळी भाजून एकत्र करून बारीक दळा.

एकदा भाजणी तयार झाली की मग, कडबोळ्या कराव्यात.

कडबोळीसाठी लागणारे साहित्य- कडबोळ्यांसाठीची भाजणी दोन वाट्या (ही भाजणी केली नसेल तर त्याएेवजी चकलीची भाजणी चालू शकेल.) तीळ दोन चमचे, मीठ एक चमचा, तिखट (लाल) एक चमचा, कडकडीत तेलाचे मोहन चार-पाच चमचे, भाजणीत मेथी पूड नसेल तर एक चिमूट मेथीपूड, तळण्यासाठी तेल.

कृती- भाजणीच्या पिठात तीळ, मीठ, तिखट, मेथीपूड एकत्र करून त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालून कोमट पाण्यात घट्ट भिजवा. थोड्या वेळाने त्याची कडबोळी तळा.

(संदर्भ: पुस्तक-मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT