Curry Leaves Chutney
Curry Leaves Chutney esakal
फूड

Curry Leaves Chutney : जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी बनवा कढीपत्त्याची चटणी, एकदम सोपी आहे रेसिपी

Monika Lonkar –Kumbhar

Curry Leaves Chutney : भारतीय स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी देखील कढीपत्ता फायदेशीर आहे.

कढीपत्त्याचा वापर केल्याने आपल्या जेवणाची चव सुधारते. त्यामुळे, अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवताना त्यांना कढीपत्त्याची फोडणी आवर्जून दिली जाते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला कढीपत्ता विविध घटकांमध्ये मिसळून खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. आज आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • कढीपत्त्याची पाने

  • तेल

  • तिखट

  • मीठ

  • पांढरे तीळ

कढीपत्त्याची चटणी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.

  • या पॅनमध्ये थोड तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने तळून घ्या.

  • पाने कुरकुरीत तळून झाली की ती थंड व्हायला एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

  • त्यानंतर, पांढरे तीळ तेलात भाजून घ्या. तीळ सोनेरी झाले की गॅस बंद करा.

  • हे तीळ आता दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या.

  • तीळ थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि कढीपत्त्याची पाने एकत्रितपणे बारीक करून घ्या.

  • जास्त बारीक करू नका ओबडधोबड पूड केली तरी चालेल.

  • त्यानंतर, या मिश्रणात लाल तिखट, मीठ आणि तेल घालून चटणी मिक्स करून घ्या.

  • तुमची कढीपत्त्याची खमंग चटणी तयार आहे.

  • ही चटणी तुम्ही जेवणासोबत, पराठ्यांसोबत, भाकरी किंवा चपातीसोबत नक्कीच खाऊ शकता.

  • या चटणीमुळे तुमच्या तोंडाला छान चव येईल, यात काही शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alliance with Ajit Pawar: अजित पवारांशी केलेली युती भाजप ब्रँडला धक्का; RSSने मुखपत्रातून सुनावले खडेबोल, म्हणाले 'राज्यात बहुमत असताना...'

NDA Cabinet: श्रीमंतांचे मंत्रिमंडळ! नवीन मंत्रिमंडळातील 71 पैकी 70 सदस्य करोडपती; किती आहे सरासरी संपत्ती?

Aus vs Nam T20 World Cup : फक्त 34 चेंडूत ऑस्ट्रेलियाने 'या' संघाला पाजलं पाणी; अन् थाटात मारली सुपर-8 एंट्री

Latest Marathi Live Updates : अजित पवार गटाकडून आज राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता

Jammu-Kashmir: यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्याचे स्केच जारी, 20 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा

SCROLL FOR NEXT