Grapes Vs Raisins  esakal
फूड

Dryfruits : खीर असो वा शीरा; प्रत्येक गोड पदार्थात असणारा मनुका घरच्या घरी कसा बनवाल?

जर तुम्ही ते बाजारातून विकत घेतले तर ते खूप महाग मिळते, परंतु जर तुम्ही ते घरी बनवले तर तुमचे बरेच पैसे वाचतील.

वैष्णवी कारंजकर

आपण जेव्हा काही पदार्थ बनवतो तेव्हा ते पदार्थ चवदार असायला हवेत, सोबतच त्यात पौष्टिक गुणधर्मही असायला हवेत याची पूर्ण काळजी घेतो. जेणेकरून हे खाल्ल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. जर आपण काहीतरी गोड बनवण्याबद्दल बोललो, मग ती खीर असो वा शीरा, आपण त्यात भरपूर ड्रायफ्रुट्स घालतो. त्यामुळे त्याची चव वाढते. यामध्ये मनुका हे सर्वात महत्वाचे आहे.

मनुक्यांमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात, जे शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करतात. जर तुम्ही ते बाजारातून विकत घेतले तर ते खूप महाग मिळते, परंतु जर तुम्ही ते घरी बनवले तर तुमचे बरेच पैसे वाचतील. आम्ही तुम्हाला घरच्या घरी बेदाणे कसे बनवायचे ते सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही कमी पैशात चविष्ट मनुके तयार करू शकता. (Food Recipe)

जर तुम्हाला घरी मनुका बनवायची असेल तर प्रथम एक किलो द्राक्षे घ्या आणि ती चांगली धुवा. नीट धुऊन झाल्यावर त्याचा देठ काढून वेगळा करा. अन्यथा त्याची चव खराब होऊ शकते. जर तुमच्याकडे इडली स्टीमर असेल तर ते पुरेसे आहे, अन्यथा स्टीमर म्हणून साधा स्टीमर वापरा.

स्टीमरमध्ये त्याच्या आकारानुसार पाणी भरा. स्टीमरच्या ट्रेमध्ये द्राक्षे भरून गॅसवर ठेवा. साधारण वीस मिनिटांनी गॅस बंद करून स्टीमर उघडल्यावर तुम्हाला द्राक्षांचा पिवळा रंग दिसेल. रंग बदलल्यानंतर ते बाहेर काढून मऊ कापडावर ठेवा आणि सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी पसरवा. दोन ते तीन दिवस असेच कोरडे राहू द्यावे.

काही वेळेनंतर तुम्हाला दिसेल की द्राक्षे लहान होऊ लागतील. कोरडे करताना लक्षात ठेवा की ते वेगळे राहतील. अन्यथा त्याच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. तिसर्‍या दिवशी तुम्ही पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवा. तुमचे मनुके तयार आहेत. एअर टाईट डब्यात ठेवून तुम्ही वर्षभर वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT