Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत आणि जाळीदार दुधी भोपळ्याचा डोसा, एकदम सोपी आहे रेसिपी

आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा दुधी भोपळा सर्वांनाच आवडतो असे नाही. मात्र, हा दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. या भोपळ्यापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा दुधी भोपळा सर्वांनाच आवडतो असे नाही. मात्र, हा दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोटासाठी चांगला असणारा हा दुधी भोपळा आरोग्यासाठी लाभदायी आहे. भोपळ्यापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

दुधी भोपळ्याची भाजी, रायता, हलवा आणि थालीपीठ इत्यादी अनेक पदार्थ या दुधी भोपळ्यापासून बनवले जातात. दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने वजन देखील कमी होते. आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याची एक खास रेसिपी सांगणार आहोत.

ही रेसिपी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे. या रेसिपीचे नाव आहे दुधी भोपळ्याचा डोसा. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही भोपळ्याच डोसा नक्कीच बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या रेसिपीबद्दल.

दुधी भोपळ्याचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • अर्धा कप किसलेला दुधी भोपळा

  • १/२ कप तांदळाचे पीठ

  • १/२ कप रवा

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • चवीनुसार मीठ

दुधी भोपळ्याचा डोसा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी किसलेला दुधी भोपळा मिक्सरमध्ये बारीक करा.

  • हे मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात थोडेसे पाणी मिसळून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.

  • आता ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. या भांड्यात आता तांदळाचे पीठ, रवा, हिरवी मिरची, मीठ आणि थोडेसे पाणी घाला.

  • डोसा बॅटर बनवण्यासाठी आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करा.

  • हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र झाल्यानंतर हे बॅटर १५ मिनिटे झाकून ठेवा.

  • आता दुसऱ्या बाजूला डोसा पॅन गॅसवर गरम करायला ठेवा.

  • पॅन गरम झाल्यानंतर त्यात गरमागरम डोसे बनवून घ्या.

  • आता खोबऱ्याच्या चटणीसोबत हा कुरकुरीत डोसा सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT