फूड

SolKadhi recipe : मालवणी स्टाइल सोलकढी

मालवणी पद्धतीचं जेवण तेव्हाच पूर्ण होतं ज्यावेळी पानात थंडगार सोलकढी असते.

शर्वरी जोशी

मालवणी पद्धतीचं जेवण तेव्हाच पूर्ण होतं ज्यावेळी पानात थंडगार सोलकढी असते. ओल्या नारळाचा चव वापरुन केलेली ही सोलकढी आज अनेक जण आवडीने पितात. विशेष म्हणजे आजकाल कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सोलकढी सहज मिळते. परंतु, अनेक जण त्यांच्या सोयीनुसार या सोलकढीच्या चवीत बदल करत असतात. त्यामुळे अद्यापही कित्येकांना अस्सल मालवणी पद्धतीची सोलकढी कशी असते हे माहित नाही. म्हणूनच, मालवणी स्टाइल सोलकढी कशी करावी ते पाहुयात. (How-To- Make-malvani-style-SolKadhi-kokum-curry-ssj93)

साहित्य -

कोकम आगळ - अर्धी वाटी

खवलेला ओला नारळ

लसूण पाकळ्या - ५ ते ६

हिरव्या मिरच्या - २

आलं - अर्धा इंच

मीठ व साखर - चवीनुसार

कोथिंबीर - अर्धा वाटी बारीक चिरलेली

पाणी - आवश्यकतेनुसार.

कृती -

प्रथम आमसुले १ तास कोमट पाण्यात भिजत ठेवा. ( शक्यतो कोकम ताजीच घ्यावीत त्यामुळे सोलकढीला रंग येतो) आमसुले भिजत असताना दुसरीकडे मिक्सच्या भांड्यात खोवलेला ओला नारळ, मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं (आवड असल्यास), मीठ व साखर घालून छान बारीक पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट करत असताना नारळातून दूध निघत असतं. पेस्ट करत असताना मध्ये मध्ये थोडं पाणी घाला ज्यामुळे नारळाचं दूध छान पातळसर होईल. त्यानंतर एका पातेल्यावर पातळ सुती कापड किंवा चाळणी ठेवा व नारळाचं दूध गाळून घ्या. जर दूध कमी झाल असेल तर पुन्हा मिक्सच्या भांड्यात थोडं पाणी घालून खोबऱ्याची पुन्हा बारीक पेस्ट करा व दूध काढा. त्यानंतर या नारळाच्या दुधात कोकम आगळ घाला व छान रंग येईपर्यंत नीट ढवळून घ्या. वर छान कोथिंबीर घाला. (कोकम आगळ चवीला प्रचंड आंबट असतो त्यामुळे तुमच्या आवडीनुसार त्याच प्रमाण घ्या.)

टीप -

१. कोकम आगळ नसेल तर आमसुले (कोकम) १ तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्याची पाणी घालून पेस्ट करा. व चाळणीच्या सहाय्याने नारळाच्या दुधात गाळून घाला.

२. नारळाचं दूध काढल्यानंतर शिल्लक असलेला नारळाचा चव टाकून न देता त्याचा वापर कोणत्याही मसालेदार भाजीचं वाटण करण्यासाठी करता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT